आंदोलनाकडे प्रमुख नेत्यांची पाठ
By Admin | Updated: March 4, 2015 00:23 IST2015-03-04T00:22:01+5:302015-03-04T00:23:20+5:30
उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या नवीन भूमिअधिग्रहण कायद्याच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़

आंदोलनाकडे प्रमुख नेत्यांची पाठ
उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या नवीन भूमिअधिग्रहण कायद्याच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ जिल्हाप्रमुख सुधीर पाटील आणि सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे हे प्रमुख पदाधिकारी वगळता इतर पदाधिकारी या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. या प्रकारामुळे शिवसैनिकांत नाराजी व्यक्त होत होती.
नवीन भूमिअधिग्रहण कायद्याचा वटहुकूम जाहीर करण्यात आला आहे़ या वटहुकूमात शेतकऱ्यांची कोणतीही जमीन सरकार ताब्यात घेणार, शेतीची किंमत ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना राहणार नाही, जमिन ताब्यात घेताना सरकारला नोटीफिकेशन देण्याची आवश्यकता नाही, ग्रामसभेचे भूसंपादनाला विरोध करण्याचे अधिकारही या आदेशाव्दारे रद्द करण्याचे प्रास्ताविक आहे. केंद्र शासनाचा हा अध्यादेश मंजूर झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे सांगत, शिवसेनेने या अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षश्रेष्ठी उध्दव ठाकरे यांच्या निर्देशावरुन मंगळवारी सेनेने हे आंदोलन पुकारले होते.
मागील विधानसभा निवडणुकांत जिल्ह्यात सर्वाधिक मते शिवसेनेने खेचलेली आहेत. त्यामुळे सेनेचे हे आंदोलनही त्याच ताकदीचे होईल अशी चर्चा होती. मात्र या आंदोलनाकडे सेनेचे खासदार, आमदार एवढेच काय माजी आमदारांनीही पाठ फिरविल्याने शिवसैनिकांतून नाराजी व्यक्त होत होती. जिल्हाप्रमुख सुधीर पाटील व सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, सभापती हरिष डावरे यांच्यासह युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, नगरसेवक सोमनाथ गुरव, राजाभाऊ घोडके, अजित पिंगळे, राजअहमद पठाण, जिप सदस्या सुषमा देशमुख, नगरसेविका प्रेमा पाटील, शामल वडणे, दिलीप शाळू, धनराज जाधव, दिलीप जावळे, शेषराव उंबरे, पप्पू मुंडे, गुणवंत देशमुख, कमलाकर दाणे, अनिल शेंडगे, सुग्रीव मुरूमकर, बाळासाहेब देशमुख, शोभा तौर, श्रीकांत देशमुख, मुजीब पठाण, कमलाकर चव्हाण, विकास मोळवणे, बापू साळुंके, सचिन बारकूल, संदीप जगताप, कमलाकर पाटील, नाना पाटील, कुणाल धोत्रीकर, श्रीराम देशमुख, पंकज पाटील, हणमंत यादव, प्रशांत साळुंके, अनंत भक्ते, विनोद निंबाळकर आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. सेनेच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)