Video: समृद्धी महामार्गावर बिबट्याचे दर्शन; वन विभागाकडून शोध सुरू
By साहेबराव हिवराळे | Updated: December 12, 2023 16:41 IST2023-12-12T16:41:01+5:302023-12-12T16:41:15+5:30
सावंगी मठ पाटी समृद्धी सर्कल गट नंबर ६ मध्ये शेतात बिबट्याचे शनिवारी रात्री दर्शन झाले.

Video: समृद्धी महामार्गावर बिबट्याचे दर्शन; वन विभागाकडून शोध सुरू
छत्रपती संभाजीनगर : सावंगी मठ पाटी समृद्धी महामार्गावर सर्कल गट नं. ६ मध्ये शेतात बिबट्याचे शनिवारी रात्री दर्शन झाले. चारचाकीतून जात असलेल्या राजू पिंपळे यांनी त्याचा व्हिडीओ रेकाॅर्ड केला असून, तो पुन्हा ’समृद्धी’च्या दिशेने निघून गेल्याचे सांगितले.
ही माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी आले. यावेळी शेजूळ यांच्या शेतवस्तीवरून चार बकऱ्या गायब असल्याचेही समजले आहे. कदाचित तो भुकेला असावा किंवा त्याच्या जोडीदाराच्या शोधात असावा, असा कयास धिरेंद्र पवार या शेतकऱ्याने व्यक्त केला.
’समृद्धी’वर वन्यजीवांना वाहनांची वर्दळ लक्षात घेता रस्ता ओलांडणे कठीण होते. दिवसभर याबाबत शहरात चर्चा सुरू होती. वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
समृद्धी महामार्गावर बिबट्याचे दर्शन; छत्रपती संभाजीनगरजवळ सावंगी मठ पाटी दरम्यान शेतात वाहनधारकांना दिसला बिबट्या #leopardvideo#samruddhimahamarga#ChhatrapatiSambhajinagarpic.twitter.com/FJRGU91M8U
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) December 12, 2023