केकत जळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:02 IST2021-09-07T04:02:11+5:302021-09-07T04:02:11+5:30
केकत जळगाव येथील सोमनाथ मगर हे आपल्या मुलांसह शेतात गेले होते. बैलांची खांदेमळणी असल्यामुळे ते बैलगाडीत मुलांना बसवून रविवारी ...

केकत जळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन
केकत जळगाव येथील सोमनाथ मगर हे आपल्या मुलांसह शेतात गेले होते. बैलांची खांदेमळणी असल्यामुळे ते बैलगाडीत मुलांना बसवून रविवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान घरी येत होते. तेव्हा त्यांना वाटेत रोडच्या बाजूला बिबट्या बसलेला आढळला; पण बैलगाडीच्या आवाजाने बिबट्या रोडलगतच्या शेतात जाऊ लागला. तेव्हा मगर यांची मुले प्रसाद (१०) व पार्थ (८) यांनी वडिलांकडून मोबाइल घेत त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे केकत जळगाव शिवारातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याची तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच भीमराव थोरे, रामेश्वर थोरे, दीपक सोहळे, अंबादास होरशील, तुकाराम बढे, सचिन थोरे, वाल्मीक गोरे, गणेश रुचके आदींनी केली आहे.