शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्या रिटर्न; चिकलठाणा एमआयडीसीमध्ये सुरक्षारक्षकांना दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 16:12 IST

मागील आठवड्यात सोमवारी ( दि. १५) शहरातील उल्कानगरी भागात बिबट्याचे प्रथम दर्शन झाले.

छत्रपती संभाजीनगर: तब्बल नऊ दिवसांनंतर शहरात पुन्हा एकदा आज पहाटे चिकलठाणा एमआयडीसीमध्ये बिबट्याचे दर्शन झाले. बीसीएल कंपनीच्या कुंपणावर पहाटे साडेपाच वाजता सुरक्षारक्षकांना बिबट्या दिसून आला. काही वेळाने बिबट्या लगतच्या झाडांमध्ये निघून गेला.

मागील आठवड्यात सोमवारी ( दि. १५) शहरातील उल्कानगरी भागात बिबट्याचे प्रथम दर्शन झाले. पहाटे साडेतीन वाजता उल्कानगरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर मंगळवारी ( दि. १६) पहाटे शंभुनगरात पोद्दार शाळेच्या मागे बिबट्याचे दर्शन झाले. विविध भागात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या अफवा सुरू असतानाच  बुधवारी ( दि. १७ ) पहाटे तर प्रोझोन मॉलमध्ये बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली. मात्र, त्याच दिवशी पाहते सिडको एन- १ मधील एका शाळेच्याजवळ सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्यानंतर बिबट्याचा थांगपत्ता लागत नव्हता. संशयित ठिकाणी पिंजरे लावून वन विभागाच्या पथकाकडून बिबट्याचा शोध सुरू होता.

तब्बल नऊ दिवसानंतर पुन्हा दर्शनदरम्यान, आज पहाटे चिकलठाणा एमआयडीसीमध्ये बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले. येथील बीसीएल कंपनीच्या कुंपणावर सुरक्षारक्षकांना बिबट्या दिसून आला. काही वेळातच बिबट्या तेथील झाडात पसार झाला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक परिसरात दाखल झाले. कंपनीच्या आवारात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. तसेच घनदाट झाडीतून बिबट्या पुढे गेल्याचे निदर्शनास आले. तसेच एका झाडाखाली तो काहीवेळ दबा धरून असल्याचा खुणा आढळल्या आहेत. यासोबतच रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल अंगर येथील बनेवाडी परिसरात देखील बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला मिळाली आहे.

असे झाले बिबट्याचे दर्शनप्रथम- सोमवारी ( दि. १५) पहाटे उल्कानगरी वेळ- पहाटे ३:४७दुसऱ्यादा- मंगळवारी ( दि. १६) पहाटे शंभुनगरात पोद्दार शाळेच्या मागे.-वेळ पहाटे ३:३०तिसऱ्यांदा - बुधवारी ( दि. १७) काबरानगर वेळ- पहाटे ३:३० वाजेदरम्यानचौथ्यांदा- माळीवाडालगत फतियाबाद येथील शेतात दोन पिलांसह मादी रात्री ९:३० वाजता.पाचव्यांदा- बुधवारी ( दि. १७)- गजबजलेल्या सिडको परिसरातील ‘प्रोझोन माॅल’च्या पार्किंग गेट परिसरात एमआयडीसी चिकलठाणा परिसरातून आगमन झाले.

बिबट्याच्या वावर असणाऱ्या क्षेत्रात रहिवाशांनी घ्यावयाची दक्षता :१) जिथे बिबट्या दिसतो त्या परिसरात त्या काळात शक्यतो समूहाने बाहेर जावे-यावे.२) बिबट्या उजेडाला दचकतो, यामुळे रात्रभर घराबाहेर लाइट चालू ठेवावेत.२) संध्याकाळच्या वेळेस राहत्या घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये.३) बिबट्या समोर आल्यास जोरात आरडा ओरड करावी व त्याला पळवून लावावे. त्यावेळी घाबरून न जाऊ नये तसेच खाली वाकू नये. खाली वाकल्यास तो हल्ला करु शक्यतो.४) रात्री उघड्यावर झोपू नये.५) शेतकऱ्यांनी शेतात पाणी देण्यासाठी रात्री जाताना सहकाऱ्यांसोबत जावे. अशावेळी मोबाइल किंवा रेडिओ असल्यास जोऱ्याने गाणी चालू ठेवावी. शक्यतो घुंगराची काठी जवळ बाळगावी.६) रस्त्यावरून जाताना अचानक बिबट्या रोड ओलांडताना दिसल्यास घाबरून जाऊ नये, त्यास डिवचण्याचा प्रयत्न करु नका.७) कधीही बिबट्याचा पाठलाग करु नये.कारण, तो घाबरून उलटा हल्ला करु शकतो.८) कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करु नये. जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो.९) बिबट्या शक्यतो मानवी वसाहतीत राहत नाही, पण त्यास डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तो प्राणघातक हल्ला करु शकतो.१०) कुत्रे, डुकरे, बकरी खाण्यासाठी कधी कधी बिबटे मानवी वसाहतीत येतात. बिबट्या सहसा आपल्या नजरेच्या आतील प्राण्यांची शिकार करतो.११) बिबट्या पकडला तर त्याची जागा लगेच दुसरा बिबट्या घेतो, यामुळे नुसते बिबटे पकडून प्रश्न सुटत नाही.१२) वन्य जीव संरक्षण आदीनियम १९७२ च्या तरतुदीनुसार बिबट्याला पकडने, मारणे अथवा इजा करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी जबरदस्त शिक्षेची तरतूद आहे. तथापी, स्वसंरक्षण इतरांच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्याने मारणे गुन्हा ठरत नाही.१३) बिबट्या संदर्भ अफवा पसरु नये, किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.१४) बिबट्या नरभक्षक झाल्यास किंवा त्याचा उपद्रव मर्यादेच्या पलीकडे गेल्यास त्यास पकडण्याचे अथवा ठार मारण्याचे अधिकार कायद्याने राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांना दिले आहेत. त्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये.१५) बिबट्या आढळल्यास किंवा त्याने जीवितहानी केल्यास त्या बाबतची माहिती तत्काळ वनविभागाला कळवावी. बिबट्याने केलेल्या जीवितहानीसाठी सानुग्रह अनुदान किंवा नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नुकसानभरपाई मिळण्यासाठी वनविभागाकडे लेखी अर्ज करावा.१६) बिबट्याची समस्या सोडविण्यासाठी जबाबदारी वनविभाग प्रमाणे आपल्या सर्वांची आहे. यामुळे या कामात स्थानिक लोकांनी वनविभागाला आवश्यकतेनुरूप सहकार्य करावे.१७) अचानक बिबट्या दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करावा, त्यास त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे आणि याबाबत वनविभागाला संपर्क साधवा, हेल्पलाईन नंबर १९२६ डायल करावा.

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforestजंगलforest departmentवनविभाग