बिबट्याच्या अफवेने रात्र जागून काढली

By Admin | Updated: March 21, 2016 00:17 IST2016-03-21T00:06:33+5:302016-03-21T00:17:55+5:30

लोहारा : तालुक्यातील देवबेट टेकडीच्या पायथाशी असलेल्या विलासपुर पांढरी, माळेगाव, वडगाव (गां) परिसरात शनिवारी रात्री बिबट्या आल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांनी अक्षरश:

A leopard rage woke up the night | बिबट्याच्या अफवेने रात्र जागून काढली

बिबट्याच्या अफवेने रात्र जागून काढली


लोहारा : तालुक्यातील देवबेट टेकडीच्या पायथाशी असलेल्या विलासपुर पांढरी, माळेगाव, वडगाव (गां) परिसरात शनिवारी रात्री बिबट्या आल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांनी अक्षरश: रात्र जागून काढली. रविवारी ही केवळ अफवा असल्याचे पुढे आल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.
शनिवारी रात्री आठच्या सुमारास विलासपुर पांढरी येथे एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून दाखल झाली. या व्यक्तीने येथील विठ्ठल मंदिरात एकाशीनिमित्त भजन करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेऊन उमरगा परिसरातील बिबट्या आता देवबेट टेकडी परिसरात आला असून, आपल्या विलासपूर पांढरीजवळील वनीकरणात तो शिरला आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. गावकऱ्यांनी सावध राहावे. बिबट्या दिसल्यास या मोबाइल नंबरवर फोन करा, असे सांगून त्याने गावकऱ्यांना एक मोबाईल नंबरही दिला. ही व्यक्ती जावळपास दोन तास गावातच होती. पाहता पाहता ही अफवा जवळच असलेल्या माळेगाव, वडगाव, जेवळी आदी गावातही पसरली. या गावात मंदिरात एकादशीनिमित्त स्पीकरवर भजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे काही अतिउत्साही व्यक्तींनी या स्पीकरवरूनही बिबट्या आल्याची माहिती दिल्याने ग्रामस्थांमध्ये चांगलीच धबराट पसरली. अनेकांनी शेताकडे गेलेल्या लोकांना घरी बोलावून घेतले. युवकांनी रात्रभर गावात खडा पहाराही दिला. त्यामुळे शनिवारची रात्र ग्रामस्थांनी अक्षरश: जागून काढली. दरम्यान, रविवारी सकाळी बिबट्याची ही अफवा असून, मुद्दाम खोळसाडपणाने ती पसरवाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता ही खोटी माहिती पसरविणारया व्यक्तीचा छडा लावून योग्य कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: A leopard rage woke up the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.