कोरोनावर लिंबू, संत्रीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:04 IST2021-04-07T04:04:47+5:302021-04-07T04:04:47+5:30

क जीवनसत्व लिंबामध्ये ९८ टक्के, संत्र्यामध्ये ६० टक्के तर मोसंबीमध्ये ५३ टक्के एवढे असते. यामुळे या तिन्हींचे सेवन ...

Lemon, orange extract on the corona | कोरोनावर लिंबू, संत्रीचा उतारा

कोरोनावर लिंबू, संत्रीचा उतारा

क जीवनसत्व लिंबामध्ये ९८ टक्के, संत्र्यामध्ये ६० टक्के तर मोसंबीमध्ये ५३ टक्के एवढे असते. यामुळे या तिन्हींचे सेवन करणे उन्हाळ्यात अधिक आरोग्यदायी ठरते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मते दरदिवशी प्रतिव्यक्तीस ४० मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी गरजेचे आहे. यामुळे दररोज लिंबाची अर्धी फोड जरी सकाळी किंवा जेवणात खाल्ली तरी त्याचा शरीराला फायदा होतो.

अलका कर्णिक

आहारतज्ज्ञ

------

चौकट

कोरोना काळातच नव्हे तर आमच्या कुटुंबात मागील २० वर्षांपासून आम्ही लिंबाचे नियमित सेवन करत आहोत. पहाटे उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून ते आम्ही पीत असतो. त्याशिवाय नियमित संत्री, मोसंबी खाल्ली जाते. यामुळे इम्युनिटी वाढते हे सत्य आहे.

रश्मी मकवाना

रहिवासी, सूतगिरणी चौक परिसर

---

कोरोनामुळे लोक आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. संत्री, मोसंबी तर आमच्या आहारामध्ये असतेच, शिवाय वर्षभर मिळणाऱ्या लिंबाचे सेवन केल्याशिवाय आमचे जेवण अधुरे असते. आता तर उन्हाळ्यात आम्ही सकाळी, दुपारी व सायंकाळी लिंबाचा रस पीत असतो.

कमलाकर पांगारकर, एन ४ येथील रहिवासी

----

Web Title: Lemon, orange extract on the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.