कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:04 IST2021-04-07T04:04:42+5:302021-04-07T04:04:42+5:30

औरंगाबाद : उन्हाचे चटके बसू लागताच शहरात लिंबू, संत्री, मोसंबीला भाव चढला आहे. शहरवासीय आता चहाऐवजी सरबत, रस पिण्यास ...

Lemon, orange, citrus extract on the corona | कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा

कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा

औरंगाबाद : उन्हाचे चटके बसू लागताच शहरात लिंबू, संत्री, मोसंबीला भाव चढला आहे. शहरवासीय आता चहाऐवजी सरबत, रस पिण्यास प्राधान्य देत आहेत. दुसरे महत्त्वाचे कारण, आहारतज्ज्ञांच्या मते, इम्युनिटी वाढविण्यास ही फळे उपयुक्त आहेत.

शहरात दररोज ८ टन पेक्षा अधिक लिंबू विकले जात आहेत तसेही उन्हाळ्यात लिंबू, संत्री, मोसंबीचे सेवन वाढत असते. त्यास आता कोरोनाकाळात इम्युनिटीवाढीच्या दृष्टीने बघितले जात आहे. त्यामुळे मागणी वाढली त्याचबरोबर भावही वधारले आहेत. घरगुती मागणी आहेच शिवाय ज्यूस सेंटरमधूनही मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव वाढत आहे. अशी मागणी राहिली तर लिंबू २०० ते २५० रुपये तर मोसंबी, संत्री १०० रुपयांपर्यंत विकली जाईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या शहरात लिंबू सरबतच्या ६० पेक्षा अधिक हातगाड्या लागल्या आहेत. तर मोसंबी ज्यूस ५० च्या जवळपास हातगाड्यांवर विकत आहे.

चौकट

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल (किलो)

लिंबू ३०-४०, ४०-५०, ५०-६०, ८०-१२० रुपये

संत्री ३०-४०,३०-४०,४०-५०, ७०-८० रुपये

मोसंबी ४०-५०,४०-५०,५०-६०,६०-८० रुपये

-------

चौकट

आवक कुठून होते

जाधववाडीत लिंबूची आवक आसपासच्या पंचक्रोशीतून व नाशिकमधून होते. कधी हैदराबादहूनही लिंबू बाजारात येतो. औरंगाबाद व जालन्याची मोसंबी देशात प्रसिद्ध आहे. पाचोड, पैठण, या भागातून मोसंबी शहरात येते तर नागपूरहून संत्री बाजारात आणली जाते.

---

फळांचे दर किती वाढले

तीन महिन्यांपूर्वी ३० ते ४० रुपये किलोने विकल्या जाणारे लिंबू सध्या चक्क ८० ते १२० रुपयांपर्यंत विकत आहे. तब्बल ४० ते ८० रुपयांनी वाढ झाली तसेच ३० ते ४० रुपये असणारी संत्री सध्या ७० ते ८० रुपये किलो तर मोसंबी तीन महिन्यांत ३० रुपयांनी वाढून ६० ते ८० रुपये किलोने मिळत आहे.

( जोड)

Web Title: Lemon, orange, citrus extract on the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.