मतदानात 'एक मराठा लाख मराठा'; 'मिळेल अनुदान तरच मतदान' लिहिलेल्या ५००० मतपत्रिका बाद

By सुमेध उघडे | Published: December 3, 2020 07:20 PM2020-12-03T19:20:08+5:302020-12-03T19:22:17+5:30

Marathwada Graduate Constituency Election : पहिल्या फेरीची मतमोजणी संपली; महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण १६९०६ मतांनी आघाडीवर

Legislative Council elections: 'Ek Maratha Lakh Maratha' in the polls; 5500 ballot papers with the slogan 'Vote only if you get grant' are rejected | मतदानात 'एक मराठा लाख मराठा'; 'मिळेल अनुदान तरच मतदान' लिहिलेल्या ५००० मतपत्रिका बाद

मतदानात 'एक मराठा लाख मराठा'; 'मिळेल अनुदान तरच मतदान' लिहिलेल्या ५००० मतपत्रिका बाद

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना २७, ८७९ मतेअपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे आणि रमेश पोकळे यांनी घेतलेल्या मतांनी चुरस

औरंगाबाद : पदवीधरच्या निवडणुकीसाठी पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु असताना जवळपास ५३८३ मतपत्रिका बाद ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व बाद मतपत्रिकांवर 'एक मराठा, लाख मराठा, मिळेल अनुदान तरच मतदान' असे लिहिले आहे.  या प्रकारामुळे रेंगाळत असलेल्या मराठा आरक्षणाचा मतदारांमध्ये असलेला तीव्र रोष दिसून आला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सकाळी ८ वाजेपासून सुरुवात  झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांनी जवळपास १७ हजाराची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीच्या ५६  हजार मतांमध्ये अवैध ठरलेल्या मतांची संख्या लक्षणीय ठरली आहेत. या फेरीत तब्बल  ५३८३ मते बाद झाली आहेत. विशेष म्हणजे बाद झालेल्या जवळपास सर्व मतपत्रिकांवर 'एक मराठा लाख मराठा, मिळेल अनुदान तरच मतदान' असे लिहिले असल्याची माहिती आहे.  

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असललेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतमोजणीची पहिल्या फेरी पूर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना २७, ८७९ मते मिळाली असून भाजपचे शिरीष बोराळकर यांना १०९७३ मते मिळाली आहेत. सतीश चव्हाण यांनी १६,९०६ मतांची आघाडी घेतली आहे. बीड येथील अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे आणि रमेश पोकळे यांनी घेतलेल्या मतांनी पहिल्या फेरीत चुरस वाढली. तसेच पहिल्या फेरीत तब्बल ५३८३ मते बाद झाली आहेत. 

अशी सुरु आहे मतमोजणी प्रक्रिया

सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी करण्यात येत आहे. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात येत आहेत. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास येतात. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल.पदवीधरसाठी नाव नोंदणी केलेल्या ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदान केले आहे. 

Web Title: Legislative Council elections: 'Ek Maratha Lakh Maratha' in the polls; 5500 ballot papers with the slogan 'Vote only if you get grant' are rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.