शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विधानपरिषद निवडणूक : पदवीधरच्या मतमोजणीसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 1:32 PM

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे विभागातील सर्व जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादेत उपस्थित

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया ३ डिसेंबर रोजी होणार असून यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादेत उपस्थित राहणार आहेत. 

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोस्टल बॅलेट मतमोजणी टेबल क्रमांक - १ साठी जालन्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी  अंकुश पिनाटे यांची तर टेबल क्रमांक - २ साठी औरंगाबादचे अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांची नियुक्ती केली आहे. मोजणी पर्यवेक्षक म्हणून ५६ अधिकाऱ्यांची तर राखीव मोजणी पर्यवेक्षक म्हणून २४ अधिकारी नेमले आहेत. मोजणी सहायक म्हणून १६८ तर राखीव मोजणी सहायक म्हणून २२ अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडा