विधानपरिषद निवडणूक : कोरोना रुग्णांनीसुद्धा बजावला हक्क; पीपीई कीट घालून पोहचले मतदान केंद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:11 IST2020-12-02T13:09:05+5:302020-12-02T13:11:55+5:30
Legislative Assembly elections: बाधित पदवीधर रुग्णांना मतदान करण्यासाठी दुपारी ४ ते ५ ही वेळ देण्यात आली होती.

विधानपरिषद निवडणूक : कोरोना रुग्णांनीसुद्धा बजावला हक्क; पीपीई कीट घालून पोहचले मतदान केंद्रात
औरंगाबाद : पीपीई कीट घालून कोरोना रुग्ण मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून १०८ रुग्णवाहिकेने थेट मतदान केंद्रांवर पोहोचले. बाधित रुग्णांना प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे मतदानाचा हक्क बजावता आला. कोरोना रुग्णांनी पहिल्यांदाच मतदान केले.
बाधित पदवीधर रुग्णांना मतदान करण्यासाठी दुपारी ४ ते ५ ही वेळ देण्यात आली होती. प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना मतदानासाठी जाण्याची सुविधा करण्यात आली होती. यापूर्वी झालेल्या मतदानात रुग्ण रुग्णालयातून थेट मतदान केंद्रांवर गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, कोरोना रुग्णांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपूर्ण खबरदारी घेतली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४ रुग्णांना मतदानासाठी सिडकोतील मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले. पीपीई कीट , हातमोजे, मास्क शिल्ड घालून या कोरोना मतदारांनी केंद्रांवर जाऊन मतदान केले. जिल्हा रुग्णालयातील ४ रुग्णांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.