पालकांसाठी व्याख्यान
By Admin | Updated: June 25, 2014 01:28 IST2014-06-25T01:16:33+5:302014-06-25T01:28:00+5:30
औरंगाबाद : लहान मुलांचा अभ्यास कसा करून घ्यावा, त्यांना स्पर्धेच्या युगात पुढे कसे आणावे, हे आणि यासारखे अनेक प्रश्न लहान मुलांच्या पालकांना पडत असतात.

पालकांसाठी व्याख्यान
औरंगाबाद : लहान मुलांचा अभ्यास कसा करून घ्यावा, त्यांना स्पर्धेच्या युगात पुढे कसे आणावे, हे आणि यासारखे अनेक प्रश्न लहान मुलांच्या पालकांना पडत असतात. याच प्रश्नांची उकल करण्याची संधी लोकमत सखी मंचने उपलब्ध करून दिली आहे. सखी मंचतर्फे ‘उमलती फुले, सुगंधित फुले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २६ जून गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे घेण्यात येणार आहे.
बालमनोविज्ञान आणि पालक- बालक संबंध या विषयावर आधारित ‘स्लाईट शो’सह व्याख्यानाचा प्रत्येकाच्या आई- बाबांनी अनुभवावा, असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी वक्त्या म्हणून पुणे विद्यापीठाच्या समुपदेशक व गोल्ड मेडलिस्ट अंजली तापडिया यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी आई आणि वडिलांनाही येण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांसाठी प्रवेश मोफत असून मागील गेटने प्रवेश करावा.