सायकलपटू अमित समर्थ यांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:35 IST2018-03-08T00:34:48+5:302018-03-08T00:35:12+5:30

सायक्लोस्पेक्ट या औरंगाबादेतील प्रसिद्ध सायकल रॅलीच्या सॉफ्टलॉचच्या प्रीत्यर्थ जगप्रसिद्ध सायकलपटू डॉ. अमित समर्थ हे औरंगाबादला ११ मार्च रोजी येत आहे. यानिमित्ताने त्याचा याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता तापडिया नाट्यमंदिरात भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

Lecture by Amit Samarth, a cyclist | सायकलपटू अमित समर्थ यांचे व्याख्यान

सायकलपटू अमित समर्थ यांचे व्याख्यान

औरंगाबाद : सायक्लोस्पेक्ट या औरंगाबादेतील प्रसिद्ध सायकल रॅलीच्या सॉफ्टलॉचच्या प्रीत्यर्थ जगप्रसिद्ध सायकलपटू डॉ. अमित समर्थ हे औरंगाबादला ११ मार्च रोजी येत आहे. यानिमित्ताने त्याचा याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता तापडिया नाट्यमंदिरात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे व्याख्यान होणार असल्याचे डॉ. संगीता देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ.अमित यांनी दहा आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. तसेच डेक्कन क्ंिलफ हँगर ही कस लावणारी स्पर्धा पूर्ण केली आहे. याशिवाय जगप्रसिद्ध सायकल रेस अ &अ‍ॅक्रॉस अमेरिका ही स्पर्धा यशस्वी पूर्ण करणारे ते पहिले भारतीय सायकलपटू ठरले आहते. या पत्रकार परिषदेला जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव चरणजित संघा, डॉ. सुनील देशमुख, डॉ. प्रफुल्ल जटाळे, विशाल पांडे, नलीन तावडे, डॉ. विजय सोळुंके, डॉ. मधुरा सोळुंके, नितीन घोरपडे, विशाल पांडे आदींची उपस्थिती होती. जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी या व्याख्यानास उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अतुल सावे, आयोजक डॉ. संगीता देशपांडे यांनी केले आहे.

Web Title: Lecture by Amit Samarth, a cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.