लोअर दुधनाचे पाणी नदीपात्रात सोडा
By Admin | Updated: June 24, 2014 00:42 IST2014-06-24T00:13:18+5:302014-06-24T00:42:04+5:30
परभणी : लोअध दुधना धरणातून नदीपात्रात आणि कॅनॉलमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

लोअर दुधनाचे पाणी नदीपात्रात सोडा
परभणी : लोअध दुधना धरणातून नदीपात्रात आणि कॅनॉलमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
मृग नक्षत्र लागून दोन आठवडे झाले. अजूनही मौसमी पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने घटली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यातच महागडी बियाणे, खते, औषधी यामुळे शेतकरी हैराण आहे. अशाही परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी कापूस व बागायती पिकांची लागवड केली आहे. त्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा दुबार लागवडीचा धोका निर्माण होऊ शकतो.
लोअर दुधना धरणात ५० टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यातून परिसरातील शेतकऱ्यांसाठी उजवा, डावा कालवा आणि नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. हे पाणी सोडल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे हे पाणी तत्काळ सोडावे, अशी मागणी जनता विकास परिषदेच्या वतीने विश्वनाथ थोरे, डी. व्ही. मुळे, श्रीकांत वाईकर, विनायक खंडागळे, रामकृष्ण पांडे, डॉ. नांदापूरकर आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
पावसाळा सुरू झाल्यानंतरही पाऊस झालेला नाही. पावसाने दिलेल्या ताणामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. पाणी पातळी हळू हळू कमी होत असून, पाणी टंचाई तसेच पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.