शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

वेळापत्रकानुसार बसेस सोडा

By admin | Updated: December 19, 2015 23:46 IST

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, लोहाऱ्यासह इतर आगारात ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी ‘स्टिंग आॅपरेशन’ करून बिघडलेल्या

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, लोहाऱ्यासह इतर आगारात ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी ‘स्टिंग आॅपरेशन’ करून बिघडलेल्या वेळापत्रकाचे वृत्त प्रसिध्द केले होते़ या वृत्ताची दखल घेत विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी संबंधित आगारप्रमुखांना वेळेत बसेस सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत़ शिवाय जिल्ह्यातील आगारांचे नवीन वेळापत्रकही लवकरच तयार करण्यात येणार असून, पुढील काही दिवसातच नवीन वेळापत्रकानुसार बसेस धावणार आहेत़जिल्ह्यातील विविध आगारातून शहरीच नव्हे तर ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बसेस वेळेवर सुटत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या़ या अनुषंगाने ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले होते़ यावेळी उस्मानाबाद स्थानकावर दुपारी १२ ते २ या कालावधीत अनेक बसेस या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिट ते १ तास उशिराने सुटल्याचे दिसून आले़ विशेषत: ग्रामीण भागातील बसेसच्या बाबतीत ही समस्या मोठी असल्याचे दिसले़ याशिवाय भूम, तुळजापूर व लोहारा येथील बसस्थानकातही अशीच परिस्थिती दिसून आली़ ‘लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेवून विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी जिल्ह्यातील सर्वच आगाराच्या प्रमुखांना शहरी, ग्रामीण भागातील बसेस वेळेवर सोडण्याबाबत सक्तीच्या सूचना दिल्या आहेत़ याशिवाय औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत नवीन वेळापत्रकाचे नियोजनही ठेवण्यात आले होते़ यात नागरिकांकडून आलेल्या नवीन बसेसची मागणी, उत्पन्न कमी देणारे मार्ग यासह इतर बाबींचा अभ्यास करून नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे़ या वेळापत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वेळेतील होतील, यासाठीही प्रयत्न करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)