शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जायकवाडी धरणात ६० टक्क्यांवरील पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:36 IST

जायकवाडी प्रकल्पाचा प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. याठिकाणी दरवर्षी पाणी येईल, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. यासाठी वरच्या धरणांत ६० टक्क्यांवर पाणी साठले, की ते खाली सोडले पाहिजे.

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाचा प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. याठिकाणी दरवर्षी पाणी येईल, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. यासाठी वरच्या धरणांत ६० टक्क्यांवर पाणी साठले, की ते खाली सोडले पाहिजे. ६० टक्के हे प्रमाण कायम ठेवावे. पाणी सोडण्यासाठी  आराखडा तयार करणाऱ्यांनी आॅक्टोबरचा विचार केला तो त्रायदायक आहे. पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यात काहीही अर्थ नसतो, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२९) येथे केले.

दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स (इंडिया)आणि सिंचन सहयोगतर्फे भानुदास चव्हाण सभागृहात ‘जायकवाडी प्रकल्प : सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप’ या विषयावर आयोजित परिसंवादात उद््घाटक म्हणून हरिभाऊ बागडे बोलत होते. व्यासपीठावर  ‘आय.ई.आय’चे अध्यक्ष डॉ. एस.डी. देशमुख, सचिव अशोक ससाणे, सिंचन सहयोगचे अध्यक्ष ई.बी. जोगदंड,  सचिव पी.डी. वझे व मिलिंद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, प्रा. प्रदीप पुरंदरे, विजयअण्णा बोराडे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, एस.पी. भर्गोदेव, शंकरराव नागरे, बापू अडकिणे आदींची उपस्थिती होती. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिसंवादाचे उद््घाटन झाले.

हरिभाऊ बागडे म्हणाले की, सिंचन आणि समन्यायी पाणीवाटप यामध्ये समन्यायी हा शब्द शेतकऱ्यांसाठी आहे, की राज्यासाठी लागू आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. जायकवाडीतीलपाणी व्यवस्थित वापरले जावे. यापुढे मोठी धरणे होणार नाहीत. मध्यम प्रकल्प, पाझर तलावांसाठी जमीन उपलब्ध होऊ शकणार नाही. जलवाहिनीद्वारे शेतापर्यंत पाणी दिले पाहिजे. धरणातील पाणी कधी सोडायचे, याचे गणित बसविले पाहिजे.  नाशिक जिल्ह्यांत मराठवाड्यासाठीचे धरण झाले. जायकवाडी गाळाने भरत असल्याने वर पाणी साठविले तर उपयोग होईल, हाच निकष त्यावेळी होता. ही चांगली कल्पना होती; परंतु ज्यांच्या भागात धरण आहे ते पाणी देऊ देत नाही, हा आता प्रश्न आहे. पावसाळ्यातच पाणी सोडले, तर पाणी वाया जात नाही. नदी कोरडी झाल्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाणी सोडले, तर खालच्या धरणात अर्धे पाणीही येण्याची शक्यता नसते, असे हरिभाऊ बागडे म्हणाले.

... अन् माईकचा पुन्हा ताबा लग्नसमारंभात आॅर्केस्ट्रापेक्षा तज्ज्ञांचे व्याख्यान ठेवले पाहिजे, असे बागडे म्हणाले. त्यांच्या मनोगतानंतर, पाणी अडविणे आणि पाणी जिरविण्यासाठी होणाऱ्या कामांमुळे धरणात पाणी येत नसल्याचे सूत्रसंचालकाने म्हटले. यावर बागडेंनी पुन्हा माईकचा ताबा घेत तात्काळ उत्तर दिले. धरणाच्या लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या ८० ते ९० टक्के लोकांचा विचार केला पाहिजे. पाझर तलाव बांधायचे नाहीत, हा समग्र विचार होत नाही. नाही तर मग जायकवाडी धरणातील पाणी सिल्लोडला येऊ द्या, असे बागडे म्हणाले.

ज्यांच्यासाठी धरण, तेच अडचणीतडॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जायकवाडी प्रकल्प पाणी नियोजन व सद्य:स्थिती’वर परिसंवाद झाला. यावेळी भर्गोदेव म्हणाले की, जायकवाडीत सध्या एकही नियमित अधिकारी नाही. एकेकाकडे चार-चार शाखा आहेत. ६० ते ७० टक्के पदे रिक्त आहेत. जायकवाडीच नव्हे, राज्यभर हेच चित्र आहे. चार वर्षांतून एकदाच पुरेसे पाणी येते. परिणामी, ज्या शेतकऱ्यांसाठी धरण बांधले त्यांचीच अडचण होते. कोणते पीक घ्यावे, याचे नियोजनच करता येत नाही. समन्यायी म्हणजे काय, याचा खेळ सुरू आहे. समस्या एक  आणि इलाज दुसराच होत आहे. शंकरराव नागरे म्हणाले की, गाळाच्या नावाखाली धरणांची क्षमता कमी दाखविली जाते.  सोडलेल्या पाण्याचा हिशोबच ठेवला जात नाही. त्यामुळे पाण्याची चोरीचा आरोप होतो.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेWaterपाणी