ट्रकच्या धडकेत ११ मेंढ्या जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:08 IST2017-09-30T00:08:57+5:302017-09-30T00:08:57+5:30
किनवट रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ११ मेंढ्या चिरडून ठार झाल्या तर ७ जखमी झाल्याची घटना सोमठाणा (प.भो.) शिवारात शुक्रवारी सकाळी घडली.

ट्रकच्या धडकेत ११ मेंढ्या जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : किनवट रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ११ मेंढ्या चिरडून ठार झाल्या तर ७ जखमी झाल्याची घटना सोमठाणा (प.भो.) शिवारात शुक्रवारी सकाळी घडली.
एमएच १३ एएक्स २०९६ या क्रमांकाचा ट्रक धर्माबादहून भोकरमार्गे इस्लापूरला जात असताना सोमठाणा शिवारात मेंढ्यांना चिरडला. यात ११ मेंढ्या जागीच ठार झाल्या तर ७ जखमी झाल्या.
यात मालक राणा राठोड यांचे दीड लाखांचे नुकसान झाले. भोकर पोलिसांनी राणा राठोड यांच्या फिर्यादीवरुन ट्रकचालक हिराजी सूर्यवंशी (रा. नवीन कौठा, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. तपास पो.नि. आर. एस. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार एन. जी. आत्राम हे करीत आहेत.