पैठण व्यापारी महासंघात युवा व्यापाऱ्यांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:03 IST2021-08-18T04:03:26+5:302021-08-18T04:03:26+5:30

पैठण : तालुका व्यापारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उगले, शहराध्यक्ष पवन लोहिया, तर सचिवपदी बलराम लोळगे या युवा व्यापाऱ्यांची सर्वानुमते ...

Lead of young traders in Paithan Traders Federation | पैठण व्यापारी महासंघात युवा व्यापाऱ्यांची आघाडी

पैठण व्यापारी महासंघात युवा व्यापाऱ्यांची आघाडी

पैठण : तालुका व्यापारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उगले, शहराध्यक्ष पवन लोहिया, तर सचिवपदी बलराम लोळगे या युवा व्यापाऱ्यांची सर्वानुमते निवड झाली. व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीत अनेक वर्षांनंतर मोठे फेरबदल झाले असून, यावेळी युवा व्यापाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. लॉकडाऊन कार्यकाळात व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते; यानंतर व्यापारी महासंघाची कार्यकारिणी नव्याने गठित करण्यात आली.

मावळते अध्यक्ष कल्याण बरकसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पवन लोहिया यांची शहराध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. त्यानंतर तालुकाध्यक्ष पदासाठी पुन्हा पहिल्याच गटाने दावा केला. तेव्हा उपस्थित व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला. त्यानंतर ज्ञानेश्वर उगले यांना तालुकाध्यक्ष पदासाठी अनुमोदन दिले, तर बलराम लोळगे यांची सचिवपदी नियुक्ती झाली. यावेळ‌ी महेश मुंदडा, विलासचंद्र पहाडे, जयकुमार बाकलीवाल, किशन तोतला, सुनील रासने, रुचिर भगत, कृष्णाशेठ लोळगे, संजय सारडा, नाथशेठ पोरवाल, उमेश तटू पाटील, श्याम पंजवानी आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

170821\img-20210816-wa0056.jpg

पैठण व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उगले, शहराध्यक्ष पवन लोहिया, व सचिव बलराम लोळगे......

Web Title: Lead of young traders in Paithan Traders Federation