शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ऑरिक सिटीतील फूड पार्कच्या आराखड्याला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 7:44 PM

जिल्हाधिकारी कार्यालयात फूड पार्कच्या कामाबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

ठळक मुद्देजानेवारी २०२१ पर्यंत पार्कचे लोकार्पण करण्याचा दावा 

औरंगाबाद : बिडकीन येथे ५१७ एकर जागेवर फूड पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात केली होती. त्यानुसार ऑरिक सिटी प्रशासनाने फूड पार्कच्या कामाचा आराखडा तयार करून जागा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी हे  फूड पार्क उत्तम पर्याय ठरेल, अशी अपेक्षा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी व्यक्त केली. जानेवारी २०२१ पर्यंत पार्कचे लोकार्पण करण्याचा दावा करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात फूड पार्कच्या कामाबाबत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे राज्याचे उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण, एमआयडीसीचे  सहमुख्य  कार्यकारी अधिकारी, तथा आॅरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, आॅरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदींची उपस्थिती होती.

देसाई म्हणाले, फूड पार्कची उभारणी चांगली झाली पाहिजे. औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा असून शेतकरी कापूस, मका, सोयाबीन, डाळिंब, शेवगा यासह विविध फळपिके, भाज्या यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. यासोबतच या ठिकाणी तुती लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र, त्यातील रेशीम कोषातून धागा तयार करण्यासाठी कोष बंगळुरू येथे पाठवावे लागतात. या सर्व पार्श्वभूमीवर बिडकीन फूड पार्कमध्ये शेतक-यांना, बचतगटांना, नवउद्योजकांना अन्नधान्य प्रकियांचे उद्योग करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध होणे शक्य आहे. 

जानेवारी २०२१ अखेरपर्यंत पार्क सुरू होईल५१७ एकर जागेवर फूड पार्क उभारले जाणार असून, यापैकी ६० एकर जागा ही विकसित आहे. ४५७ एकर जागेचा आराखडा तयार करावा लागणार आहे. त्याचे प्लॅनिंग, आराखडा उद्योगमंत्री देसाई यांना सादर करण्यात आला.  जानेवारी २०२१ अखेरीस या फूड पार्कचे लोकार्पण करण्यात येईल, असा विश्वास डॉ. अनबलगण यांनी व्यक्त केला. फूड पार्कच्या आराखड्याबाबत संचालक जाधव यांनी माहिती दिली. 

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादfoodअन्न