औरंगाबादेत गुलाबाच्या पाकळ्या झाडून संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 19:00 IST2017-10-02T19:00:37+5:302017-10-02T19:00:46+5:30
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी एसटी महामंडळाच्या संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा चक्क गुलाबाच्या पाकळ्या झाडून शुभारंभ झाला.

औरंगाबादेत गुलाबाच्या पाकळ्या झाडून संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी एसटी महामंडळाच्या संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा चक्क गुलाबाच्या पाकळ्या झाडून शुभारंभ झाला. या कार्यक्रमास प्रमुख अथिती म्हणून जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपमहापौर स्मिता घोगरे, एसटीचे उपमहाव्यवस्थापक मधुकरराव पठारे , विभाग नियंत्रक राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी जि.प.अध्यक्षांनी अस्वच्छ जागेत झाडू मारू,अशी सूचना केली. परंतु महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करून उद्घाटन उरकले.