जालना बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ

By Admin | Updated: December 27, 2016 00:12 IST2016-12-27T00:08:07+5:302016-12-27T00:12:23+5:30

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली.

Launch of cotton procurement in Jalna market committee | जालना बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ

जालना बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली.
सीसीआयचे केंद्र प्रभारी एस.सी. वर्मा, देशमुख यांनी बोली लावून कापूस खरेदीस सुरूवात केली. प्रारंभाचा भाव ५१०० रूपये देण्यात आला. यावेळी ५१०० ते ४९०१ रूपयां दरम्यान ३७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
यावेळी खाजगी व्यापारी कमल बगडिया, आनंद मंत्री, राधामोहन अग्रवाल, पवन गौड, शरद गुप्ता, बाजार समितीचे संचालक अनिल सोनी, रमेश तोतला, सचिव गणेश चौगुले, मोहन राठोड, अनिल खंडाळे, रामेश्वर चिनके, संजय छबिलवाड,प्रफुल हिवरेकर, संजय जाधव, मुन्ना कुचेरिया, श्रीकांत कचरे, बाबूराव क्षीरसागर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of cotton procurement in Jalna market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.