जलयुक्त दिंडीचा जालन्यात शुभारंभ

By Admin | Updated: April 15, 2015 00:39 IST2015-04-15T00:25:12+5:302015-04-15T00:39:40+5:30

जालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलयुक्त दिंडीचा (मोबाईल व्हॅन) शुभारंभ

Launch of a burnt stem in Jalna | जलयुक्त दिंडीचा जालन्यात शुभारंभ

जलयुक्त दिंडीचा जालन्यात शुभारंभ


जालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलयुक्त दिंडीचा (मोबाईल व्हॅन) शुभारंभ आ. अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते मंगळवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण चिंचकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, तहसीलदार रेवननाथ लबडे, तालुका कृषी अधिकारी अरूण पंडित, नायब तहसीलदार कोकाटे, एस.बी. घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाणी हा अत्यंत महत्वाचा विषय असून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला अधिक गती द्यावी, असे प्रतिपादन आ. खोतकर यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी नायक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ही मोबाईल व्हॅन जालना व बदनापूर तालुक्यात प्रत्येकी १५ दिवस गावोगाव फिरणार असून त्याद्वारे जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यावेळी पंडितराव भुतेकर, जे.एस. गारूळे, विलास निघवेकर, खोबरे, पवार, आर.के. गायकवाड, नरवडे, उगले, सौंदर, एस.एस. पवार, गुंजाळ अंजली सोनवलकर, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदींची उपस्थिती होती. यावेळी जलयुक्त अभियानाअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of a burnt stem in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.