लातूरची लोकसंख्या गेली २४.५ लाखांवर

By Admin | Updated: July 11, 2014 00:58 IST2014-07-11T00:01:32+5:302014-07-11T00:58:33+5:30

लातूर : लातूर जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, २४ लाख ५४ हजार १९६ लोकांचा जिल्हा झाला आहे.

Latur's population was 24.5 lakhs | लातूरची लोकसंख्या गेली २४.५ लाखांवर

लातूरची लोकसंख्या गेली २४.५ लाखांवर

लातूर : लातूर जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, २४ लाख ५४ हजार १९६ लोकांचा जिल्हा झाला आहे. त्यात १२ लाख ७३ हजार १४० पुरुष तर ११ लाख ८१ हजार ५६ महिला असून, ३ लाख १७ हजार ८११ शून्य ते ६ वयोगटांतील बालकांचा समावेश आहे.
मागील काळात जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र कुटुंब नियोजनासारख्या योजना शासनाने राबविल्यामुळे लोकसंख्या वाढीला काही प्रमाणात आळा बसला आहे. सध्या २४ लाख ५४ हजार १९६ इतकी लोकसंख्या आहे. त्यात शून्य ते ६ वयोगटांतील बालकांची संख्या ३ लाख १७ हजार ८११ आहे.
कुटुंब नियोजनासारख्या योजना राबविल्याने लोकसंख्या वाढीला आळा घातला आहे. परंतु, त्यात निरक्षरतेचे प्रमाण सध्या तरी चिंताजनक आहे.
एकूण लोकसंख्येत ८ लाख ३ हजार ५२४ लोक निरक्षर आहेत. त्यात ३ लाख ४० हजार ७०८ पुरुषांचा समावेश असून, ४ लाख ६२ हजार ८१६ महिलांचा समावेश आहे. साक्षरता ६७.२६ टक्के आणि निरक्षरता ३२.७४ टक्के आहे.
एकूण लोकसंख्या २४ लाख ५४ हजार १९६, त्यातील १२ लाख ७३ हजार १४० पुरुष तर ११ लाख ८१ हजार ५६ महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत १ लाख ५३ हजार ७४२ महिला कमी आहेत. (प्रतिनिधी)
१६.५० लाख साक्षर...
जिल्ह्याच्या २४ लाख ५४ हजार १९६ लोकसंख्येपैकी १६ लाख ५० हजार ६७२ लोक साक्षर आहेत. यात ९ लाख ७२ हजार ४३२ पुरुष साक्षर आहेत. तर ७ लाख १८ हजार २४० महिला साक्षर आहेत. यातही महिला साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. आधीच महिलांची संख्या कमी अन् त्यांच्या निरक्षरतेचे प्रमाण अधिक, असा असमतोल महिला-पुरुषांचा आहे.
कामगारांची संख्या वाढली...
कुशल, अकुशल आणि मजुरी करणाऱ्या कामगारांची संख्या मात्र जिल्ह्यात वाढलेली आहे. १० लाख ४६ हजार ८५७ मजूरदार वर्गांची संख्या असून, त्यात ६ लाख ७० हजार १८ पुरुष रोजंदारीवर जाणारे आहेत. तर ३ लाख ७६ हजार ८४९ महिला मजुरी करतात. यातील कुशल-अकुशल मजुरांची संख्या कमी आहे. परंतु, रोजंदारीवर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर जिल्हाभरात ४ लाख ८१ हजार ७७२ कुटुंब असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी एस.ए. थोरात यांनी दिली.

Web Title: Latur's population was 24.5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.