आपसातील भांडणामुळे प्रेमी युगुल अवतरले ठाण्यात!

By Admin | Updated: August 1, 2014 00:25 IST2014-07-31T23:57:12+5:302014-08-01T00:25:27+5:30

मुुरूड : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेले लातूर तालुक्यातील गादवड येथील एक पे्रमी युगुल आपसातील भांडणामुळे गुरुवारी पहाटे मुरूड पोलिस ठाण्यात दाखल झाले़

Late couples come from Avtarle Thane due to mutual conflict | आपसातील भांडणामुळे प्रेमी युगुल अवतरले ठाण्यात!

आपसातील भांडणामुळे प्रेमी युगुल अवतरले ठाण्यात!

मुुरूड : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेले लातूर तालुक्यातील गादवड येथील एक पे्रमी युगुल आपसातील भांडणामुळे गुरुवारी पहाटे मुरूड पोलिस ठाण्यात दाखल झाले़ यापूर्वीच दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे मुरुड पोलिसांनी प्रियकर तरूणास ताब्यात घेतले आहे़
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूर तालुक्यातील गादवड येथील रफिक मुबारक शेख याने एका १७ वर्षीय मुलीस २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता फूस लावून पळवून नेले़ मुलीच्या वडिलांनी दोन-तीन दिवस मुलीचा शोध घेतला़ परंतु, ती सापडत नसल्याने मुरुड पोलिसात २ जून रोजी तक्रार दिली़ तक्रारीनंतर मुुरुड पोलिसांनी या युगलाच्या मोबाईल लोकेशनवरून तपास सुरु केला़ दरम्यान, हे युगुल पुण्यात दाखल झाले़ गेल्या दोन महिन्यात तरुणाने मुलीवर अत्याचार केले़
दरम्यान, या दोघांत भांडणे होऊन मुलीने वडिलांकडे जाण्याचा आग्रह धरला़ पण तरूणाने त्यास विरोध केला़ तरूणीने त्यास आत्महत्येची धमकी दिली़ अखेर गुरुवारी पहाटे ५ वाजता हे जोडपे मुरुड पोलिस ठाण्यात हजर झाले़ अगोदरच गुन्हा दाखल असल्याने मुरुड पोलिसांनी आरोपी रफिक मुबारक शेख (रा़ गादवड) यास ताब्यात घेतले़ याप्रकरणी अधिक तपास पोहेकॉ़ सुरेश उस्तुर्गे करीत आहेत़(वार्ताहर)

Web Title: Late couples come from Avtarle Thane due to mutual conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.