गतवर्षी २२ खून आणि ४० जणांवर प्राणघातक हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:05 IST2021-04-14T04:05:06+5:302021-04-14T04:05:06+5:30
गतवर्षी २०२० मध्ये २२ जणांचे खून करण्यात आले, तर ४० जणांवर खुनी हल्ल्याच्या घटना घडल्या ...

गतवर्षी २२ खून आणि ४० जणांवर प्राणघातक हल्ले
गतवर्षी २०२० मध्ये २२ जणांचे खून करण्यात आले, तर ४० जणांवर खुनी हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांसोबत शस्त्राने वार करून दुखापत करण्याच्या ८०० घटना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झाल्या होत्या.
==============
दोन वर्षांत जप्त केली ७० शस्त्रे
२०१९ आणि २०२० या दोन वर्षांच्या कालावधीत पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करून सुमारे ७० तलवारी जप्त केल्या होत्या.
====================
गावठी कट्टे आणले जातात बिहार, मध्य प्रदेशातून
आजपर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून जप्त केलेली गावठी कट्टे आणि अन्य शस्त्रे ही मध्य प्रदेशातून आणल्याचे दिसून आले. तेथे गावठी कट्टे पाच ते सात हजारांत मिळतात. यामुळे काही शस्त्र तस्कर शस्त्र खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात.