अहमद पटेल यांना अखेरचा निरोप
By | Updated: November 28, 2020 04:00 IST2020-11-28T04:00:58+5:302020-11-28T04:00:58+5:30
भरुच : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या पार्थिवावर गुजरातमधील भरुच जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ...

अहमद पटेल यांना अखेरचा निरोप
भरुच : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या पार्थिवावर गुजरातमधील भरुच जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
भरुचच्या पिरमान गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना निर्देशांचे पालन करत नातेवाईकांनी पीपीई कीटचा वापर केला. अहमद पटेल यांचे पुत्र फैसल आणि मुलगी मुमताज यांचे राहुल गांधी यांनी सांत्वन केले.
.......