प्रचाराची शेवटची सभा व्हायची गणेशपार मोंढा भागातच
By Admin | Updated: June 4, 2014 01:29 IST2014-06-04T00:31:53+5:302014-06-04T01:29:05+5:30
संजय खाकरे , परळी विधानसभा असो की लोकसभा, नगर परिषद असो की बँक निवडणुका; खा. मुंडे यांची प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा गणेशपार आणि मोंढ्यात ठरलेली असायची.

प्रचाराची शेवटची सभा व्हायची गणेशपार मोंढा भागातच
संजय खाकरे , परळी विधानसभा असो की लोकसभा, नगर परिषद असो की बँक निवडणुका; खा. मुंडे यांची प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा गणेशपार आणि मोंढ्यात ठरलेली असायची. या शेवटच्या प्रचारसभेच्या नागरिकांची तुफान गर्दी होते असे. या सभेने शहरातील ‘हवा’च पलटून जायची आणि भाजपा-सेनेला यश हमखास मिळायचे. अपवाद ठरला ती नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुकीची शेवटची सभा. यावेळी शेवटची प्रचार आ. पंकजा मुंडे यांनी घेतली राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे घेतली. गोपीनाथ मुंडे यांचे तडाखेबाज भाषण ऐकण्यासाठी प्रत्येक सभेला ग्रामस्थांची नागरिकांची विराट गर्दी व्हायची. परळी व परिसरातील ग्रामस्थांची मुंडे यांच्यावर अपार श्रद्धा होती. दवाखान्याचे उद्घाटन, दुकानांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हायचे. डॉक्टरही दवाखान्याच्या उद्घाटनाला मुंडे यांना बोलवायचे. मित्रांचे कौतुक आणि मार्गदर्शकाची प्रशंसा गोपीनाथ मुंडे परळीच्या खाजगी कार्यक्रमात आपल्याला कोणकोणत्या मित्रांनी व वडिलधार्यांनी कसे सहकार्य केले हे सांगायला विसरत नसत. पूनमचंद कुटील, पन्नालाल जैन, पी.डी. जोशी, सुखदेवराव मुंडे, दिनकर मुंडे, अशोक सामत अशा अनेक लोकांचा उल्लेख ते करायचे मनमुराद हसवायचे उद्घाटन असतो की जाहीर सभा असो, त्यामधुन उपस्थितांना मनमुराद हसवायचे त्याला दाद देत उपस्थित दाद देत असत. विरोधकांची खिल्ली ही चांगल्या प्रकारे उडवायचे आणि विरोधी पक्षातील चांगल्यांचे ही कौतुक करायचे, हा खा. मुंडे यांचा मूळ स्वभाव. लहान असो वृद्ध सर्वांना भेटायचेच गोपीनाथ मुंडे परळीतील ‘यशश्री’ बंगल्यावर सकाळी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांला भेटायचे, बोलायचे. आपुलकीने त्यांची विचारपूस करायचे. जोपर्यंत भेटणारे लोक आहेत त्या सर्वांना ते भेटायचे. मुलगी पंकजावर सोपवायचे धुरा गेल्या तीन वर्षापासून लग्न समारंभ, उद्घाटने, लोकांच्या गाठी-भेटींची जबाबदारी मुलगी पंकजावर सोपवित होते. परळीत आले की ते आपल्या कुटुंबासह वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात जायचे. तत्पूर्वी दोन मिनिट मंदिराच्या कार्यालयात जाऊन विश्वस्तांशी चर्चा करायचे. शेवटच्या सभा बीड: लोकसभा निवडणुकीत प्रचार थांबला त्यादिवशी गोपीनाथराव मुंडे यांनी बीडच्या माळीवेस भागात शेवटची सभा घेतली. त्यानंतर मंत्री झाल्यावर मुंडे रविवारी भगवानगडावर आले होते. तेथे त्यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी त्यांचा सत्कार झाला. त्यांचे भाषणही झाले होते. मंगळवारी औरंगाबादसह बीडमध्ये त्यांचे कार्यकर्ते होते. (प्रतिनिधी)