आडनाव अखेर दुरूस्त

By Admin | Updated: December 11, 2014 00:44 IST2014-12-11T00:05:56+5:302014-12-11T00:44:23+5:30

बीड : निवडणूक विभागाकडून झालेल्या आडनावातील चुकीमुळे एका विवाहित महिलेचे किडणीचे आॅपरेशन रुकले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

Last Last Updated | आडनाव अखेर दुरूस्त

आडनाव अखेर दुरूस्त


बीड : निवडणूक विभागाकडून झालेल्या आडनावातील चुकीमुळे एका विवाहित महिलेचे किडणीचे आॅपरेशन रुकले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. अखेर बुधवारी या आडनावात दुरुस्ती करून ‘थपाटे’चे ‘धपाटे’ करण्यात आले. या दुरुस्तीमुळे मीनाक्षीच्या जीवनात एक नवी पहाट येणार आहे.
वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथे मीनाक्षी रामेश्वर धपाटे हे कुटूंब वास्तव्यास आहे. रामेश्वर यांचा २०१० साली मीनाक्षी सोबत विवाह झाला. मात्र पहिल्या अपत्यादरम्यान तिची किडणी खराब असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यासाठी दीड लाख रुपये खर्च येत होता. रामेश्वर धपाटे यांची परिस्थिती हलाकीची होती, म्हणून त्यांनी शासनाच्या राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले होते.
त्याप्रमाणे ते शिर्डी येथे गेले. मात्र निवडणूक विभागाकडून मतदान ओळखपत्रावर ‘धपाटे’चे ‘थपाटे’ झाले. रेशनकार्ड आणि मतदान कार्डवरील नावात तफावत आल्याने मीनाक्षीचे आॅपरेशन रुकले होते. नावातील दुरुस्तीसाठी अनेकवेळा तहसील कार्यालयात खेटे मारूनही काम होत नसल्याने धपाटे पार खचले होते.
तहसीलदार एन.जी.झंपलवाड, नायब तहसीलदार एस.डी.चऱ्हाटे, शेख रफीक यांनी आडनावातील दुरूस्ती केली. (प्रतिनिधी)
केवळ आडनावातील चुकीमुळे माझ्या पत्नीची शस्त्रक्रिया रुकली होती. मात्र आता नावातील दुरूस्ती झाली असून अवघ्या तीन दिवसात मीनाक्षीचे आॅपरेशन करणार असल्याचे पती रामेश्वर धपाटे यांनी सांगितले. त्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले़

Web Title: Last Last Updated