भविष्य निर्वाह निधीचा हप्ता अखेर जमा
By Admin | Updated: April 16, 2016 01:35 IST2016-04-16T01:26:23+5:302016-04-16T01:35:34+5:30
सेनगाव : तालुक्यात सहाव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधीचा पाचवा हप्ता पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे गेल्या आर्थिक वर्षात वेळेवर देयके

भविष्य निर्वाह निधीचा हप्ता अखेर जमा
सेनगाव : तालुक्यात सहाव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधीचा पाचवा हप्ता पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे गेल्या आर्थिक वर्षात वेळेवर देयके मंजूर न केल्याने परत गेला होता. या प्रकरणी ‘लोकमत’चे वृत्त प्रकाशित होताच प्रलंबित भविष्य निर्वाह निधीची २६ लाख ५० हजार रुपये निधी उपलब्ध झाला असून शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सहाव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांचा पाचवा हप्ता व केंद्रप्रमुखांच्या दुसरा हप्त्याची देयके येथील पं.स.ने मंजूर केली आहेत. त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची २६ लाख ५० हजार तर केंद्रप्रमुखांची तीन लाख ७० हजार रुपयाची देयके मंजूर केली. संबंधीताच्या भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा करण्यासाठी धनादेश सेनगाव पं.स.च्या लेखा विभागाने मुख्य लेखा विभाग यांच्याकडे पाठविला आहे. गतवर्षी शिक्षकांच्या पाचव्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता. परंतु निर्धारित वेळेत देयके गटविकास अधिकारी स्तरावर प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने निधी परत गेला होता. यामुळे शिक्षकवर्गात नाराजी होती. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच तो निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रलंबित रक्कम उपलब्ध केल्याबद्दल शिक्षक संघटनेने गटविकास अधिकारी बी.एस. पाचपाटील, सहाय्यक लेखा अधिकारी बंडाळे यांचा सत्कार केला. यावेळी विजय राठोड, शिवलिंग साखरकर, श्रीराम महाजन, के.बी. डांगे, रामेश्वर चोपडे, पी.एन. पोपळघट, विलास आधळे, राहुल लव्हडे, शेख हबीब, के.एन. काळे, एल.वाय. भालेराव, आर.एन. गिरी, बी.टी. काळे, गजानन गोरे, प्रकाश बोरुडे, गजानन मुळे, गजानन पत्की, व्ही.एम. जाधव, ओ. वाय. कोटकर, रमेश भिंगे, जगन्नाथ खिराडे, आर.पी. खिल्लारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)