शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

दौलताबाद किल्ल्यामागचे १३ व्या शतकातील केवडाबन मोजतय अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 3:58 PM

राजाने मारले, निसर्गाने फटकारले

ठळक मुद्देकेवड्याचा उसना गंध घेण्याची येणार वेळ...केवडा मोजतोय अंतिम घटका 

- प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : केवडा... नाव घेतले तरी सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत असल्याचा भास न होणारा व्यक्ती निरळाच. म्हणूनच या केवड्याने पार देवापासून सर्वसामान्यांच्या मनाची एक कुप्पी आपल्यासाठी राखूनच ठेवली आहे. महाराष्ट्रीयन मनातील सुगंधाची ही कुप्पी भरली जायची माळीवाड्यातील (ता. जि. औरंगाबाद) केवड्याने. परंतु राजाने मारले व निसर्गाने फटकारल्याने माळीवाड्यातील या केवड्याचा सुगंध लोप पावतो आहे. यंदा तर श्रावण सुरू होऊन आठवडा उलटला पण अजूनही झाडावर केवडा दिसत नसल्याने घोर आणखीनच वाढला आहे.गणेशोत्सवाला सुरुवात होताच बाजारात काटेरी हिरव्या पातीमध्ये पिवळाधमक केवडा दिसायला लागतो. गणराया व महालक्ष्मी यांना केवडा प्रिय. नेमका याच काळात केवडा बाजारात येतो. मात्र, यंदा केवड्याच्या घमघमाटाला मुकण्याची वेळ आली आहे.  

दौलताबाद किल्ल्यामागे माळीवाडा गाव केवड्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. १३ व्या शतकापासून आपल्या सुवासाची किमया राखून असलेले हे केवडाबन आता हळूहळू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. गावातील नागझरी नदीकाठावरील ७ एकर जमिनीवर केवड्याची झाडे आहेत. पूर्वी येथे १५ ते २० हजार केवड्यांची झाडे होती. १९७२ च्या दुष्काळाने या बनावर पहिला घाव घातला. त्यात अनेक झाडे वाळली. पुढे नदीतील रसायनयुक्त पाण्यानेही गळचेपी सुरू केली.  शेतकरी रमेश आसवार सांगतात की, ‘‘आजघडीला नागझरी नदीच्या केवळ ४ कि.मी.च्या काठावरच ५ ते ७ हजार झाडे उरली आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गामुळे या पुलाचा विस्तार झाला व रुंदीकरणात केवडाबनातील १०० पेक्षा अधिक झाडे तोडावी लागली. जी झाडे शिल्लक आहेत ती पाणी कमी पडल्याने वाळत आहेत. केवड्यास उसापेक्षाही जास्त पाणी लागते. पाणी कमी पडले तर झाडांची पाने पिवळी पडायला लागतात. दरवर्षी श्रावण महिन्यात केवडा येण्यास सुरुवात होते, पण अजूनही झाडावर केवडा दिसत नाही.’’ 

देवगिरीत १३ व्या शतकात यादवांचे राज्य होते. त्यावेळी माळीवाड्यातील बनातील केवड्यापासून सुवासिक अत्तर तयार केले जात असे. महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांतच केवड्याचे तुरळक बन शिल्लक राहिले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील पापनसबन, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथे व ठाण्याजवळील डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे केवडाबन आहे.

दुसऱ्या ठिकाणी आलाच नाही केवडा मागील वर्षी चालू विद्युत तार पडल्याने आमच्या शेतातील २५ पेक्षा अधिक केवड्यांची झाडे जळून नष्ट झाली. आम्ही केवडा दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला, पण तेथे झाडे आलीच नाही. ज्या ठिकाणची झाडे जळाली त्याच ठिकाणी पुन्हा केवडा लावला, पण झाड मोठे होण्यास व केवडा येण्यास १० वर्षे लागतील.-अमोल मुळे, शेतकरी, माळीवाडा 

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गNatureनिसर्ग