औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 03:43 PM2020-10-27T15:43:34+5:302020-10-27T15:44:02+5:30

जिल्ह्यात सध्या १,०३२ रुग्णांवर उपचार सुरू

Large decline in corona patients in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी ८४ नवे रुग्ण, ३ रुग्णांचा मृत्यू, १०४ कोरोनामुक्त

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ७१ दिवसांनंतर सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट झाली आणि दुहेरी संख्येत रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात ८४ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर उपचार पूर्ण झालेल्या १०४ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात १७ ऑगस्ट रोजी ६४ रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर प्रत्येक दिवशी तिहेरी आकड्यात कोरोनाचे रुग्ण आढळत होते. अनेकदा ही संख्या चारशेच्या जवळ गेली होती. जिल्ह्यात सध्या १,०३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३७,५६५ झाली आहे. जिल्ह्यात  एकूण रुग्णांपैकी ३५,४७४ रुग्ण बरे झाले आहेत, तर एकूण १,०५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात आढळलेल्या नव्या ८४ रुग्णांत ग्रामीण भागातील १६,  मनपा हद्दीतील २६ आणि अन्य ४२ रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन टेस्टद्वारे  मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाला ४२ आणि ग्रामीण भागात ८ रुग्ण आढळले. मनपा हद्दीतील २२ आणि ग्रामीण भागातील ८२, अशा १०४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना एन-९ येथील ६७ वर्षीय स्त्री, पडेगावातील ८० वर्षीय स्त्री आणि सिल्क मिल कॉलनीतील ६१ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील रुग्ण
सिद्धनाथ वडगाव १, गंगापूर ४, शहापूर, गंगापूर २, लासूर १, देवपूळ, कन्नड १, फुलंब्री १, कन्नड २, पैठण १, सिल्लोड ३.

मनपा हद्दीतील रुग्ण
बायजीपुरा १, मुकुंदवाडी १, काल्डा कॉर्नर १, वेदांतनगर १, मिटमिटा १, एन-१ सिडको १, देवळाई परिसर, सातारा १, शिवाजीनगर १, सह्याद्री हिल्स १, केशवनगरी १, प्रोझोन मॉलजवळ १, पडेगाव २, घाटी परिसर २, चेतनानगर १, नक्षत्रवाडी २, सावंगी, हर्सूल १, चिकलठाणा १, बन्सीलालनगर १, मिलिट्री हॉस्पिटल १, जहांगीर कॉलनी १, मुकुंदवाडी २, जवाहर कॉलनी १.

Web Title: Large decline in corona patients in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.