लॅपटॉप दुरुस्तीचा ग्राहक मंचाचा आदेश
By Admin | Updated: June 24, 2017 23:54 IST2017-06-24T23:47:21+5:302017-06-24T23:54:02+5:30
औरंगाबाद : वॉरंटी काळात बिघडलेला लॅपटॉप दुरुस्त करून देण्यास नकार देणाऱ्या लिनोव्हो कंपनीस औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दुरुस्तीचा आदेश दिला आहे.

लॅपटॉप दुरुस्तीचा ग्राहक मंचाचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वॉरंटी काळात बिघडलेला लॅपटॉप दुरुस्त करून देण्यास नकार देणाऱ्या लिनोव्हो कंपनीस औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दुरुस्तीचा आदेश दिला आहे.
ग्राहक पी. के. कुलकर्णी यांनी मे २०१५ मध्ये हा लॅपटॉप खरेदी केला. त्यास मूळ एक वर्षासह योजनेअंतर्गत अतिरिक्त शुल्क भरून जादा दोन वर्षे अशी एकूण तीन वर्षे या वस्तूची वॉरंटी ग्राहकास मिळाली. तथापि मे २०१६ मध्ये लॅपटॉपच्या स्क्रीनवर आतून दोन तडे दिसू लागले. त्यानंतर त्याच्या बॉडीचा एक कोपराही खराब झाला. मात्र दीर्घ पाठपुराव्यानंतरही कंपनीने दुरुस्तीस नकार दिला. लिनोव्होचे पुणे येथील अधिकारी समीर मतकर यांनी हे ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्याचे सांगितले. कुलकर्णी यांनी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावला. मंचच्या अध्यक्षा नीलिमा संत, सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांच्यासमोर हे प्रकरण चालले. मे २०१७ मध्ये कंपनीने विनाशर्त मोफत दुरुस्ती करून देण्याचे कबूल केले.