शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

लाखात झाली मनधरणी

By admin | Updated: June 23, 2017 01:05 IST

औरंगाबाद : जनसुविधा कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी तीन गटनेते व काही मोजक्या सदस्यांना ४० लाखांच्या वरच निधी वाटप करण्यात आला आहे.

विजय सरवदे । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपल्या भूमिकेला विरोध करू नये, यासाठी राजकीय पक्षांचे गटनेते व सभागृहाला धारेवर धरणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना लाखो रुपयांच्या निधीचे ‘गिफ्ट’ देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न अध्यक्षांकडून झाला असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे. जनसुविधा कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी तीन गटनेते व काही मोजक्या सदस्यांना ४० लाखांच्या वरच निधी वाटप करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यक्षांच्या या भूमिकेमुळे जि. प. सदस्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. अलीकडे जि. प. अध्यक्षांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांचा अध्यक्षांच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रशासन आणि सदस्यही नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची अडीच वर्षे पार पाडण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांचे गटनेते तसेच सभागृहाला धारेवर धरणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना लाखो रुपयांच्या निधीचे ‘गिफ्ट’ देऊन त्यांची ‘बोलती’ बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सदस्य सांगतात. जनसुविधा योजनेतून स्मशानभूमी शेड, कब्रस्तानसाठी संरक्षक भिंत आणि ग्रामपंचायत इमारत ही तीनच कामे करता येतात. यासाठी ‘डीपीडीसी’कडून मार्चपूर्वीच जिल्हा परिषदेला निधी मिळाला आहे. मात्र, प्राप्त निधीचे नियोजन अलीकडे करण्यात आले. यासंबंधी काही सदस्यांनी आक्षेप घेतला तेव्हा ग्रामपंचायतींकडून यासंबंधी प्रस्ताव आले होते. त्यानुसार नियोजन केल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडून अलीकडे तसे प्रस्ताव तयार करून घेण्यात आल्याचा आरोप मनसेचे सदस्य विजय चव्हाण यांनी केला आहे.