शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

"ना सिलिंडरची चिंता, ना रांगेची भीती!"; लाडगावकरांना 'पाइपलाइन गॅस' ठरतोय वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 20:15 IST

३ तीन वर्षांपूर्वीच पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा सुरू : ना सिलिंडर टंचाईची फिकीर, ना युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम

- श्रीकांत पोफळे

करमाड : युद्धामुळे साऱ्या देशात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत असताना, तालुक्यातील लाडगाव येथील नागरिक मात्र निर्धास्त आहेत. कारण, तीन वर्षांपूर्वीच घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा योजना सुरू करण्यात आली.

भारत पेट्रोलियमच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन जवळपास ३०० घरात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा सुरू केला, तेव्हापासून पाइपलाइनद्वारे येत असलेल्या गॅसने स्वयंपाक होत असून, सध्या उद्भवलेल्या सिलेंडरच्या टंचाईची चिंता नसल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर - जालना महामार्गावर असलेल्या संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथे १२ सप्टेंबर २०२३ ला भारत पेट्रोलियम कंपनीकडून घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा हा उपक्रम सुरू करण्यात आला. ३०० पेक्षा जास्त घरांना व गावठाण हद्दीजवळ असलेल्या काही हॉटेल व्यावसायिकांनी देखील या योजनेत पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा सुरू करून घेतला. या योजनेत लाभ घेते वेळी लाभार्थ्यांनी पाच हजार रुपये डिपॉझिट व एक हजार रुपये कनेक्शन जोडणी शुल्क भरले. प्रत्येक कनेक्शनला किती गॅस वापरला, हे दिसण्यासाठी मीटर बसविण्यात आले. मागील तीन वर्षांपासून ही योजना सुरळीत सुरू असून, २ वेळा पाइपलाइन लिकेज झाल्याची समस्या उद्भवली होती, मात्र अवघ्या पंधरा मिनिटांत कंपनीच्या कामगारांनी ही पाइपलाइन सुरळीत करून दिली.

कटकटीतून मुक्तगावात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करणारी आमची मराठवाड्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. या योजनेमुळे नागरिकांची ३० टक्के आर्थिक बचत होत असून, सिलिंडरसाठी नोंदणी किंवा प्रतीक्षेच्या कटकटीतून मुक्त असल्याने समाधान आहे.- जयश्री बागल, सरपंच लाडगाव/हिवरा ग्रुप ग्रामपंचायत

हॉटेलचा गॅसपुरवठा अखंडमाझ्या हॉटेलवर या योजनेतून व्यावसायिक दराने गॅसपुरवठा सुरू केलेला आहे, मात्र मला सिलिंडरपेक्षा कमी खर्च येत असून, सध्या सुरू असलेल्या टंचाई काळातही माझ्या हॉटेलचा गॅसपुरवठा अखंड सुरू आहे.-सुंदर बागल, हॉटेल व्यावसायिक.

English
हिंदी सारांश
Web Title : Ladgaon residents benefit from pipeline gas, avoiding cylinder woes.

Web Summary : Ladgaon enjoys uninterrupted gas supply via pipeline, a boon during cylinder shortages. Initiated three years ago by Bharat Petroleum with Gram Panchayat support, the scheme covers 300 homes, saving residents money and eliminating cylinder hassles.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर