बोकूड जळगाव येथील शाळेत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:04 IST2021-07-29T04:04:56+5:302021-07-29T04:04:56+5:30

६ जुलै रोजी उपशिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी चौरे यांनी रामदास नाईक शाळेची तपासणी केली. यात ...

Lack of school facilities in Bokud Jalgaon | बोकूड जळगाव येथील शाळेत सुविधांचा अभाव

बोकूड जळगाव येथील शाळेत सुविधांचा अभाव

६ जुलै रोजी उपशिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी चौरे यांनी रामदास नाईक शाळेची तपासणी केली. यात शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क नाही, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी नसल्याचे त्यांना आढळून आले. विद्यालयात १६० विद्यार्थी असून, शाळेत १४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती आहे. या शाळेत संगणक, प्रयोगशाळा, ग्रंथालय व क्रीडा साहित्य नाही. या शाळेत संस्थापक व सचिव यांच्याकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विद्यालयात कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याचा ठराव ही घेण्यात आला आहे. शाळेत विद्यार्थ्यांना सर्व सोईसुविधा उपलब्ध करून द्या, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या संचालक मंडळाला दिले आहे.

ग्रामस्थांची पुन्हा तक्रार

शिक्षणाधिकाऱ्यांनी सुविधा उपलब्ध करून देण्याची केलेली सूचना शाळा प्रशासनाने पाळली नसल्याचे ग्रामपंचायतच्या पथकाने केलेल्या पाहणीत आढळून आले. यानंतर, त्यांनी पुन्हा शाळेविषयी तक्रार दाखल केली आहे.

फोटो..

बोकूड जळगाव येथील रामदास नाईक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा उपलब्ध नाही.

Web Title: Lack of school facilities in Bokud Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.