राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव - शरद पवार
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:47+5:302020-12-04T04:12:47+5:30
राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारण्यास देश तयार आहे का, असे माजी खासदार आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन ...

राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव - शरद पवार
राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारण्यास देश तयार आहे का, असे माजी खासदार आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन यांनी मुलाखतीदरम्यान शरद पवार यांना विचारले असता पवार म्हणाले की, यासंदर्भात प्रश्न आहेत. त्यांच्यात सातत्याचा अभाव दिसतो.
बराक ओबामा यांनी अलीकडेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, शिक्षकाला प्रभावित करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यासारखे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत; परंतु त्यांच्यात अभियोग्यता आणि विषयात प्राविण्य मिळविण्याच्या उत्कटतेचा अभाव आहे.
याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले की, हे आवश्यक नाही की, आम्ही प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. आमच्या देशातील नेतृत्वाबाबत आम्ही काहीही म्हणू शकतो; पण दुसऱ्या देशातील नेतृत्वाबाबत बोलणार नाही. ही मर्यादा पाळायला हवी. मला वाटते की, ओबामा यांनी ही मर्यादा ओलांडली आहे.
काँग्रेसचे भवितव्य आणि राहुल गांधी हे पक्षासाठीचा अडथळा याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे नेतृत्व यावर अवलंबून आहे की, ते कशाला मंजुरी देतात. पवार म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना आहे.
.......