छत्रपती संभाजीनगर : धावत्या रेल्वेच्या दरवाजातून थुंकताना तोल जाऊन खाली कोसळलेल्या ताहेर खान नवाज खान (३४, रा. बरकतनगर, परभणी) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता शिवाजीनगर भागातील रेल्वेरुळावर हा अपघात घडल्याचे पुंडलिकनगरचे निरीक्षक कुंदन जाधव यांनी सांगितले.
शिऊर बंगला येेथे जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी ठेकेदाराने कामासाठी बाेलावल्याने ताहेर चुलत भाऊ कौसर खान व मित्र कुणाल गवळी यांच्यासह परभणीवरून रेल्वेने निघाला होता. मुकुंदवाडी स्थानकाच्या पुढे रेल्वे आल्यानंतर शिवाजीनगरमधील परिसरात ताहेर थुंकण्यासाठी रेल्वेच्या दरवाजात गेले. तेथून थुंकताना त्यांचा तोल गेला व धावत्या रेल्वेतून थेट खाली फेकले गेले. प्रवाशांनी चैन ओढल्यानंतर रेल्वे थांबली. भाऊ, मित्राने धाव घेत स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत ताहेर यांचा मृत्यू झाला होता.