कोयत्याने गुप्तांगावर स्वत:च केला वार
By Admin | Updated: June 18, 2014 01:31 IST2014-06-18T00:57:23+5:302014-06-18T01:31:25+5:30
हिंगोली : पंचवीसवर्षीय महाराजाने स्वत:च्या हाताने गुप्तांगावर कोयत्याने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथे घडली.

कोयत्याने गुप्तांगावर स्वत:च केला वार
हिंगोली : पंचवीसवर्षीय महाराजाने स्वत:च्या हाताने गुप्तांगावर कोयत्याने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथे घडली. हिंगोलीतील डॉक्टरांनी १३ टाके घालून तातडीने उपचार केल्यामुळे या महाराजाचे प्राण वाचले.
हिंगोली तालुक्यातील जांभरूण तांडा येथील रहिवासी असलेला गोविंद पवार (वय २५) मागील काही वर्षांपासून संन्याशाप्रमाणे जीवन जगत आहे. सध्या तो ढेगज येथील एका मंदिरात राहतो.
मंदिराच्या बांधकामाचे ५ हजार रूपये का दिले नाहीत म्हणून दोन दिवसापूर्वी मिस्त्रीकाम करणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्याशी वाद घातला. औंढा येथे ही वादावादी झाल्यानंतर रात्रभर बेचैन असलेल्या या महाराजाने सोमवारी सकाळी कोयत्याने आपल्या गुप्तांगावर तीन - चार वार केले. यात गंभीर दुखापत झाल्याने ग्रामस्थांनी महाराजास तातडीने हिंगोली येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या विनंतीवरून जनरल सर्जन डॉ. जी. पी. बांगर, अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. मनिष बगडिया यांनी शस्त्रक्रिया करून तब्बल १३ टाके घातले. आता या महाराजाची प्रकृती सुधारली असून आणखी सात दिवस उपचार केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)