शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल भरतीत घोळ !

By admin | Updated: March 5, 2015 00:04 IST

सोमनाथ खताळ , बीड कोतवाल भरतीसाठी उमेदवार हा ज्या त्या तालुक्यातीलच रहिवाशी असावा, असा नियम आहे,

सोमनाथ खताळ , बीडकोतवाल भरतीसाठी उमेदवार हा ज्या त्या तालुक्यातीलच रहिवाशी असावा, असा नियम आहे, मात्र वडवणी येथील कोतवाल भरतीत बीड तालुक्यातील उमेदवारालाच पात्र ठरविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात इतर उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी धाव घेतली आहे. कोतवाल भरती पारदर्शक होण्यासाठी प्रशासन स्तरावरून कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही वडवणी तालुक्यात या भरतीत अपात्र उमेदवारालाच पात्र ठरविण्यात आल्याची धक्कादायक माहिती बुधवारी ‘लोकमत’ समोर आली आहे. वडवणी तालुक्यात कोतवालाच्या एकुण १२ जागा होत्या. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ७ जागा होत्या, यामध्ये दोन जागा महिलांसाठी होत्या. मात्र पुरूषांच्या भरतीत घोळ झाला असून सय्यद कौसर मोहतीन हा उमेदवार बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथील रहिवाशी असताना सुद्धा त्याला २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या तोंडी परीक्षेत पात्र ठरविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत घोळ झाला असून ही भरती रद्द करण्यात यावी, अशी मागणी इतर उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे.उमेदवारांनी घेतला आक्षेपसय्यद कौसर या उमेदवाराचे नाव बीड तालुक्यातील केसापुरी परभणी ेयेथील मतदान यादीतही (कार्ड क्रं.टीक्यूटी २०७११६५) आहे आणि वडवणी शहरातही (कार्ड क्रं. वायवायवाय ६९२२५७९) त्याचे नाव आहे. त्यामुळे हा उमेदवार नेमका आहे कुठलचा? असा प्रश्न पडला असून या भरतीत घोळ झाल्याचा आरोप इतर पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.तर होऊ शकतो गुन्हा दाखलसय्यद कौसर याने डीएडची पदवी मिळवलेली आहे. तालुक्याबाहेर अर्ज करून त्याने नियमाचे उल्लंघन तर केलेच शिवाय खोट्या माहितीआधारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो.