शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कोळी समाजासाठी केंद्रात आवाज उठवणार

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

भोकर : पुढची पाऊले टाकताना सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम मी करतोय़ आदिवासी कोळी समाजबांधवाच्या समस्यांसाठी मी सतत प्रयत्न केले़ आता याबाबत केंद्रातही आवाज उठवणार आहे़

भोकर : पुढची पाऊले टाकताना सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम मी करतोय़ आदिवासी कोळी समाजबांधवाच्या समस्यांसाठी मी सतत प्रयत्न केले़ आता याबाबत केंद्रातही आवाज उठवणार आहे़ प्रत्येक समाजाला कोणी ना कोणी मित्र असतो़ तसा मी कोळीमित्र आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड येथे झालेल्या आदिवासी कोळी समाज संघटनेच्या मेळाव्यात केले़रणछोडदास मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात व्यंकटराव मुदिराज, पं़ स़ सभापती सखुबाई गोणेवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव वागेलीकर, शंकरराव बारडकर, सिद्धेश्वर पिटलेवाड, संजय मोरे, संजय कोलते, पुरभाजी मदनवाड यांची उपस्थिती होती़ खा. अशोकराव चव्हाण म्हणाले, गरीब माणसासाठी मी नेहमीच धावून येतो़ मराठा आरक्षण, मुस्लिम समाजाचे आरक्षण असो वा इतर समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार राहिला आहे़ कोळी समाजाचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे़ यामुळे या समाजातील कठीणप्रसंगी मी सोबत होतो़ नवीन पिढीसाठी चांगले दिवस यावेत यासाठी सतत प्रयत्न करणार आहे़ ज्यांची मागील निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झाली ते पाच वर्षे मतदार संघापासून गायब होते़ आता दस्ती बदलून अच्छे दिन तोंडी घालून फिरत आहेत़ ते कुठेही गेले तरी जनसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देवू शकत नाहीत, असा टोला डॉ़ किन्हाळकरांना नाव न घेता अशोकरावांनी लगावला़ यावेळी अमिता चव्हाण यांना निवडून देण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले़ मतदारसंघाच्या विकासासोबतच तुमचे कोणतेही काम असू द्या, आमदार व खासदारांचे पत्र एकदाच मिळेल, असेही अशोकरावांनी सांगितले़ (वार्ताहर)