शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

औरंगाबाद जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 20:56 IST

औरंगाबाद : कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जि. प. उपकरातून पावणेदोन कोटींचे गेट खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तथापि, पाणी अडविण्यासाठी या महिन्यात जि. प. सिंचन विभागाने काही बंधाºयांना उपलब्ध गेट टाकले असले, तरी आॅगस्ट महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे सध्या बहुतांशी बंधारे कोरडेठाक आहेत.

औरंगाबाद : कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जि. प. उपकरातून पावणेदोन कोटींचे गेट खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तथापि, पाणी अडविण्यासाठी या महिन्यात जि. प. सिंचन विभागाने काही बंधा-यांना उपलब्ध गेट टाकले असले, तरी आॅगस्ट महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे सध्या बहुतांशी बंधारे कोरडेठाक आहेत.

यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सांगितले की, जि. प. जलसंधारण समितीने १ कोटी ७५ लाख रुपयांचा गेट खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर उपविभागनिहाय गेट खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात जि. प. उपकरातून पावणेदोन कोटी रुपयांची गेट खरेदीसाठी तरतूद करण्यात आली. त्यानुसार जलसंधारण समितीने सदरील प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर ई- निविदा प्रक्रियेस मान्यता मिळाली. पावणेदोन कोटी रुपयांतून १ हजार ८०० गेट खरेदी केले जाणार आहेत. उपकरातून रबरी सील खरेदीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावालाही जलसंधारण समितीने मान्यता दिली असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मागील तीन वर्षांपासून गेट खरेदीचा प्रस्ताव चर्चेत आहे. पूर्वी जि. प. अर्थसंकल्पात उपकरातील २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची गेट खरेदीसाठी तरतूद करण्यात आली होती. दोन-अडीच वर्षांपासून सातत्याने निविदा काढण्यात आल्या; पण पुरवठादार संस्थांकडून निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या वर्षी एक पुरवठादार संस्था तयार झाली.

मात्र, विद्यमान सदस्य मंडळाने सर्वसाधारण सभेत गेट खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तरतूद असतानाही प्रशासनाला गेट खरेदी करता आले नाहीत. केवळ गेटअभावी कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी अडवता येत नव्हते. यंदा पाऊस कमी झाला व त्यात पावसाचा मोठा खंडही पडला. त्यामुळे जिल्ह्यातील बंधा-यांमध्ये पाणी साचू शकले नाही. आता खरेदी करण्यात येणाºया गेटचा यंदा फायदा होणार नसला, तरी पुढील काळात याचा फायदा नक्कीच होईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे म्हणाले.३५७ बंधा-यांना गेट बसविलेजिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. यापैकी ३५७ बंधाºयांना पुरेसे गेट आहेत. उर्वरित २२८ बंधा-यांपैकी काहींना कमी गेट आहेत, तर काहींना गेटच नाहीत. यासाठी ७ हजार ५०० गेटची आवश्यकता आहे. उपकरातील निधीतून यंदा १ हजार ८०० गेट खरेदी केले जाणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३८ बंधाºयांना १५५६ गेट बसविले जाणार आहेत. जि. प. उपकर व जलयुक्त शिवार योजनेतून या वर्षात सुमारे साडेतीन हजार गेट बसविले जातील.

 

टॅग्स :DamधरणAurangabadऔरंगाबाद