किरकोळ वादातून नगरसेविकेच्या भावावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:04 IST2021-04-10T04:04:46+5:302021-04-10T04:04:46+5:30
पैठण शहरातील संतनगर भागात घडली. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नारळा, गांगलवाडीच्या नगरसेविका ...

किरकोळ वादातून नगरसेविकेच्या भावावर चाकूहल्ला
पैठण शहरातील संतनगर भागात घडली. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नारळा, गांगलवाडीच्या नगरसेविका माया आडसूळ यांचा भाऊ जालिंदर आडसूळ यांचा संतनगर भागातील लाल्या कारकेसोबत किरकोेळ वाद झाला. यानंतर जालिंदर आडसूळ तेथून परत जात असताना लाल्या कारकेने पाठीमागून येत बेसावध असलेल्या जालिंदर आडसूळच्या पाठीत चाकूने सपासप वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या जालिंदर आडसूळ यांना नागरिकांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमा गंभीर असल्याने जालिंदर आडसूळ यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले आहे.
दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपी लाल्या कारके यास ताब्यात घेतले. या घटनेनंतर संतनगर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.