शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘गुडघ्या’चे बाशिंग झाले सैल

By admin | Updated: July 7, 2015 00:54 IST

औरंगाबाद : निवडणुकीसाठी वर्षभरापासून सातारा- देवळाईत तयारीला असलेल्या ‘भावी’ उमेदवारांचा उत्साह ओसरत गेला अन् आता तर घिरट्या घालणारी चाके जैसे थे अवस्थेत रुतली

औरंगाबाद : निवडणुकीसाठी वर्षभरापासून सातारा- देवळाईत तयारीला असलेल्या ‘भावी’ उमेदवारांचा उत्साह ओसरत गेला अन् आता तर घिरट्या घालणारी चाके जैसे थे अवस्थेत रुतली. ग्रामपंचायतीमधून, नगर परिषद आणि महानगरपालिकेत समावेश असे रहाटगाडगे नागरिकांनी पाहिले. २५ वॉर्डातून फक्त दोनच वॉर्ड अस्तित्वात आले. अर्धा लाख मतदार दोन भागांत विखुरले गेले. वॉर्ड आरक्षणात खुला आणि एसटी महिला वॉर्ड सुटल्याने अनेकांनी ‘गुडघ्याला बांधून ठेवलेले बाशिंग’च सैल झाल्याचे कबूल करीत आपापल्या कामावर जाणे पसंत केले आहे. पावसाने जोराची सुरुवात केल्याने बोअरची काहीअंशी पाणी पातळी वाढली. मनपाचे २१ टँकर आजही सुरू असल्याने मग उगाच कशाला व्यर्थ श्रम वाया घालवायचे म्हणून नशिबाला दोष देत कार्यकर्ते सध्या तरी ‘भूमिगत’ झाल्याचे दिसत आहे. अहो काय चाललंय? कोण उमेदवार तयारीत आहे? असे प्रश्न एकमेकांना विचारले जात आहेत. परंतु प्रत्येक जण त्या चर्चेतच ‘रस’नसल्याचा आव आणून मला घरचे अर्जंट काम आहे, मी जाऊन येतो, असा बहाणा करीत निघून जाताना दिसत आहे. सातारा वॉर्ड एस.टी. महिलेसाठी राखीव झाल्याने आता उमेदवार कोण असा सवाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. स्थानिक उमेदवार शोधावर सर्वच पक्षांनी भर दिल्याचे दिसत आहे. आम्ही एक- दोघे पाहून ठेवले आहेत. परंतु पक्ष कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार; याची आम्हाला कल्पना नाही, असे सांगून कार्यकर्ते वेळ मारून नेत आहेत. खुल्या वॉर्डाकडे अनेकांच्या नजरा वळल्या असल्या तरी आपला ‘शिक्का’ त्या वॉर्डात चालेल का? शेवटी पक्षाची मर्जी राखणारा कोण? तेथे आपला काय निभाव लागणार आहे ? असे अनेक प्रश्न इच्छुकांसमोर आहेत. या भागात अतिक्रमण पाडापाडी हा कळीचा मुद्दा आहे. ४धनिकांची चालणार की जनतेच्या कामात श्रम ओतणारा या विषयीही जनता विचार करीत आहे. परंतु अनेक जण मनपा की नगर परिषद अशा आशेवर ‘छापा -काटा’ करीत आहेत. कारण याविषयीची याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत सर्वच पक्षांनी मौन धरले आहे. बहुतांश जनता म्हणते की, कोणीही असो; रस्ते,पाणी, वीज, ड्रेनेज हे प्रश्न सोडवा, पण पुन्हा हातोडा नको.