शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

किरीट सोमया बनले अधिकारी! अधिकार नसताना सिल्लोडमध्ये कागदपत्रांची केली तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:40 IST

सोमय्या यांनी जवळपास ४५ मिनिटे सर्व फायली चाळल्या. त्यानंतर त्यांनी प्रशासनावर कसलीच चौकशी न करता ४ हजार ७३५ बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला.

सिल्लोड : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील विविध कागदपत्रांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी दुपारी २ वाजता ४५ मिनिटे तपासणी केली. त्यानंतर प्रशासनाने ४ हजार ७३५ बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला.

सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी १ वाजता भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या आले व तडक ते उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या कक्षात दाखल झाले. त्यानंतर पठाण यांच्या बाजूला व्हीआयपींसाठी ठेवलेल्या विशेष खुर्चीत बसून त्यांनी तासभर त्यांच्या समोर बसलेले तहसीलदार संजय भोसले व बाजूला बसलेले पठाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पठाण यांना जन्म नोंदणी प्रमाणपत्रांच्या फाईल दाखवण्यास सांगितले. त्यामुळे पठाण यांंनी त्यांच्यासमोर जन्म नोंदणी प्रमाणपत्रांचा गठ्ठा ठेवला. सोमय्या यांनी जवळपास ४५ मिनिटे सर्व फायली चाळल्या. त्यानंतर त्यांनी प्रशासनावर कसलीच चौकशी न करता ४ हजार ७३५ बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला. तेथून ते दुपारी ३ वाजता नगरपरिषद कार्यालयात गेले. तेथे मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर हे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी ५ मिनिटे उपमुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस प्रमाणपत्र कसे काय दिले? असा प्रश्न केला. त्यावर उपमुख्याधिकाऱ्यांनी त्यांना मुख्याधिकारी साहेबांशी चर्चा करून माहिती द्यावी. मी नवीन आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर सोमय्या तेथून निघून गेले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

परवानगी नसताना फायली तपासल्याच कशा?किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी पठाण यांना सिल्लोड येथे २० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता येणार आहे, असे पत्र १९ जानेवारी रोजी दिले होते. मात्र, पठाण यांनी त्यांच्यासमोर विविध फायलींचा गठ्ठाच ठेवला. त्यानंतर सोमय्या यांनी सर्व कागदपत्रे तपासली. हे प्रमाणपत्रे कोणत्या अधिकाराने तपासली? आणि पठाण यांनीही शासकीय कागदपत्रे त्यांंना कशी दिली? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर