शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक ठेवा! महाराजा जसवंतसिंह ३५० वर्षांपूर्वी पूजा करत असलेल्या श्रीरामाची मूर्ती सुरक्षित

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 26, 2026 19:14 IST

छत्रपती संभाजीनगर ते जोधपूर कनेक्शन! किराडपुरा भागात जतन केलाय १५ व्या शतकातील रामलल्लाचा वारसा

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या छत्रपती संभाजीनगरात आजही अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्यांचा इतिहास थक्क करणारा आहे. असाच एक अनमोल आणि आध्यात्मिक ठेवा शहरातील किराडपुरा भागात जतन करून ठेवण्यात आला आहे. तब्बल ३५० वर्षांपूर्वीच्या या प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या प्राचीन मूर्ती आजही येथील श्रीराम मंदिरात सुरक्षित असून, त्यांचा इतिहास थेट राजस्थानच्या राजघराण्याशी जोडलेला आहे.

महाराजा जसवंतसिंहांचे श्रद्धास्थानइतिहासाच्या नोंदीनुसार १६६२ ते १६६५ या कालखंडात जोधपूरचे पराक्रमी महाराजा जसवंतसिंह हे छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) मधील याच परिसरात वास्तव्यास होते. त्या काळात त्यांनी या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे एक भव्य मंदिर उभारले होते. विशेष म्हणजे, हे मूळ मंदिर पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार करण्यात आले होते. महाराजा जसवंतसिंह स्वतः या मंदिरात येऊन या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करत असत.

दीड- दोन फुटाच्या पंचधातूच्या मूर्तीया मूर्तींचे ऐतिहासिक महत्त्व केवळ मौखिक ज्ञान परंपरेवर अवलंबून नाही, तर पुरातत्त्व विभागाकडेही या मूर्ती १५ व्या शतकातील असल्याच्या नोंदी आहेत. काळाच्या ओघात मंदिराच्या मूळ लाकडी संरचनेत बदल झाले असले, तरी मंदिर ट्रस्टने या मौल्यवान मूर्तींचे जतन केले आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, गरुडराज या मूर्ती पंचधातूंच्या असून, दीड ते दोन फुटांच्या आहेत.

३८ वर्षांपासून मंदिराचा कारभार ट्रस्टकडेस्वातंत्र्यप्राप्तीनंतर या ऐतिहासिक मंदिराची जबाबदारी सुरुवातीला महाराष्ट्र शासनाकडे होती. त्यानंतर १९८८ मध्ये सरकारने या मंदिराची व्यवस्था श्रीरामचंद्र मंदिर (मठ) ट्रस्टकडे सोपवली. माजी खासदार बाळासाहेब पवार हे या ट्रस्टचे पहिले अध्यक्ष बनले. त्यांच्यासोबत लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, बाळासाहेब श्रीमंत, मोरेश्वर सावे यांसारख्या मान्यवर व्यक्तींनी विश्वस्त म्हणून काम पाहिले. सध्या मानसिंह पवार हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

लोकसहभागातून १९९३ मध्ये जीर्णोद्धार१९९३ मध्ये लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. आज या ठिकाणी ५ फुटांहून अधिक उंचीच्या सुबक संगमरवरी मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. या श्रीराम पंचायतन मूर्ती आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 350-Year-Old Lord Rama Idol, Worshipped by Maharaja Jaswant Singh, Preserved

Web Summary : Aurangabad preserves 350-year-old Rama idols worshipped by Maharaja Jaswant Singh. The 15th-century Panchadhatu idols, originally housed in a wooden temple built by the Maharaja, are now managed by a trust after being under government control. A renovation occurred in 1993 with public support.
टॅग्स :Ram Navamiराम नवमीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर