लग्नास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण
By Admin | Updated: April 16, 2016 01:02 IST2016-04-16T01:02:23+5:302016-04-16T01:02:23+5:30
गेवराई : तालुक्यातील रोहितळ येथील एका विद्यार्थिनीने लग्नास नकार देताच बेशुद्ध करुन तिचे अपहरण केले. ही खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली.

लग्नास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण
गेवराई : तालुक्यातील रोहितळ येथील एका विद्यार्थिनीने लग्नास नकार देताच बेशुद्ध करुन तिचे अपहरण केले. ही खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन गेवराई ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून सर्व आरोपी फरार आहेत.
अमोल खरात असे आरोपीचे नाव असून तो गावातीलच आहे. पीडित विद्यार्थिनी बारावीच्या वर्गात आहे. अमोल खरातने पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीला संपर्क करुन विद्यार्थिनीस गेवराईत बोलावून घेतले. अमोल खरात याने ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हटले. विद्यार्थिनीने नकार दिल्याने नाकाला रूमाल लावून बेशुद्ध करून ज्ञानेश्वर खरात, जगन खरात व अनोळखी कार चालकाच्या मदतीने त्याने कारमध्ये टाकून पुणे, मुंबई व भावनगर, सूरत येथे नेले. नातेवाईकांनी तिचा छडा लावून सुटका केली. परत आल्यावर पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पो. कॉ. आर. बी. वाघमार हे करीत आहेत. आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)