शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
4
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
5
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
6
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
7
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
8
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
9
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
10
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
11
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
12
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
14
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
15
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
16
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
17
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
18
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
19
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
20
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुकादमाकडून ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण

By admin | Updated: November 4, 2014 01:40 IST

पाचोड : उचल घेऊनही मजूर ऊसतोडणीसाठी न आल्याने मुकादमांनी संगनमत करून ऊसतोड मजुराच्या अकरावर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार कुतूबखेडा येथे घडला;


पाचोड : उचल घेऊनही मजूर ऊसतोडणीसाठी न आल्याने मुकादमांनी संगनमत करून ऊसतोड मजुराच्या अकरावर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार कुतूबखेडा येथे घडला; परंतु पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मुकादमाचा पाठलाग केल्याने कांबी (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथे मुलाला सोडून मुकादम फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आकाश अण्णासाहेब नरवडे (११) असे अपहरण होऊन सुटका झालेल्या मुलाचे नाव आहे. मुकादम अशोक शिंदे (रा. कांबी, ता. शेवगाव), बाबासाहेब वडरी (दहाळा, ता. अंबड) व एक अनोळखी, अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले, आकाशचे वडील अण्णासाहेब छगन नरवडे यांनी भुईज सहकारी साखर कारखान, सातारा येथील तीन मुकादमांशी ऊसतोडणीचा करार केला होता.
त्यांच्याकडून अण्णासाहेबने ३५ हजार रुपयांची उचल घेतली होती; मात्र ते या कराराप्रमाणे सातारा येथील कारखान्यावर ऊसतोडणीसाठी न जाता दुसऱ्याच कारखान्यावर गेले. दरम्यान, त्यांनी आपल्या मुलांना आई-वडिलांकडे ठेवले होते. ही माहिती मुकादमांना समजल्यावर ते कुतूबखेडा गावात आले.
यावेळी अण्णासाहेब यांचे वडील छगन हे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पैठणला गेले होते. त्यांची आई शेतात काम करीत होती. मुलगा आकाश घरीच खेळता होता.