अ‍ॅसिडच्या धाकावर युवतीस पळविले

By Admin | Updated: July 13, 2017 00:20 IST2017-07-13T00:16:37+5:302017-07-13T00:20:33+5:30

हिंगोली : शहरातील श्रीनगर मधील एका मुलीच्या अंगावर तेजाब टाकण्याची धमकी देत २० जून रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पळविल्या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी

The kidnapped daughter of the acid was abducted | अ‍ॅसिडच्या धाकावर युवतीस पळविले

अ‍ॅसिडच्या धाकावर युवतीस पळविले

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील श्रीनगर मधील एका मुलीच्या अंगावर तेजाब टाकण्याची धमकी देत २० जून रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पळविल्या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात १२ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
श्रीनगर भागात माहेरी राहणारी ही विवाहित युवती आपल्या भावाच्या मुलीसोबत आदर्श महाविद्यालयात २० जून रोजी टी. सी काढण्यास गेली होती. दरम्यान, तेथे जिल्हा कचेरीतील पुरवठा विभागात काम करणारा कर्मचारी वहीदखान समशेरखॉन (४२) रा. श्रीनगर तेथे आला. त्याने या युवतीजवळ जावून ‘तुला काहीतरी बोलायचे आहे, थोड बाजूला चल नसता तुझ्या अंगावर तेजाब टाकतो’ असे म्हणत तिला बाजूला नेल.
तिच्या पाठीमागे भावाची मुलगी जात असता तुझे तू काम कर, तू आलीस तर तुझ्याही अंगावर तेजाब टाकील, अशी धमकी दिली. त्यामुळे भावाची मुलगी परत आल्यानंतर ते दोघेही तेथून गायब झाल्याचे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या मुलीने यापूर्वीही वहीद मोबाईलवर फोन करून त्रास देत असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर कर्मचाऱ्यास चौकशीसही बोलावले होते. आता हा प्रकार घडल्याने ३६६ कलमान्वये वहीदविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पकडलेले वाळूचे वाहन चोरून नेले
औंढा नागनाथ : येथील तहसील कार्यालयात वाळूची तस्करी करणारे जप्त केलेले ट्रॅक्टर वाळूमाफियांनी चोरून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा तालुक्यातील बोरजा गावाजवळ अवैधपणे वाळूची तस्करी करीत असलेले ट्रॅक्टर मुद्देमालासह ताब्यात घेवून जप्त केल्याची कारवाई ३ जुलै रोजी करण्यात आली होती. सदर ट्रॅक्टर हे तहसील कार्यालयाचा कॅम्पस्मध्ये लावले होते. ११ जुलै रोजी जप्त केलेले ट्रॅक्टर सकाळी घेवून जात असताना शिपाई गायकवाड यांनी पाहिले होते. यावेळी गायकवाडने त्यांना कोणाच्या सांगण्यावरून घेवून जात असल्याचे विचारले असता त्यांनी कारकुन पाथरकर यांनी सोडल्याचे खोटे सांगून ट्रॅक्टर वाळूसह घेवून गेले असल्याचे फिर्यादी नमूद केले आहे. नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी वाहनचालक आयुब कडू शेख. (रा. हिंगोली) व मालक शमू जलाल शेखविरूद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: The kidnapped daughter of the acid was abducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.