शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खामसवाडी गावातील ‘तो’ गोंधळ दारूच्या नशेत

By admin | Updated: October 17, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला होता़ गोंधळ घालणाऱ्या त्या इसमाविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे़उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पेट्यांमध्ये घालून बसमधून उस्मानाबादकडे आणण्यात येत होत्या़ त्यावेळी बसमध्ये बिघाड झाल्याने ती गावात थांबली होती़ त्यावेळी बसमधील मतदान यंत्रणेच्या पेट्या पळविण्याचा प्रयत्न झाल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत पोलिस प्रशासनाने घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीअंती प्रसिध्दीपत्रक काढले आहे़ त्यात नमूद केले की, मतदान प्रक्रिया झाल्यानंतर मतदान यंत्रणेसह पोलिस कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना घेवून येणाऱ्या बसचे (क्ऱएम़एच़२०-बी़एल़०७८७) फोकस (हेडलाईट) बंद पडल्याने गावातील शाळेजवळ थांबविण्यात आली होती़ त्यावेळी तेथे दारू पिवून आलेल्या चंद्रकांत उर्फ पप्पू बाळासाहेब पाटील (वय-३२ राख़ामसवाडी) हा बससमोर आरडाओरड करीत गोंधळ घालत होता़ त्यावेळी क्षेत्रीय अधिकारी तथा कळंब येथील सामाजिक वनिकरण विभागातीलचे कर्मचारी अशोक दशरथराव घुले यांनी दुसरी बस मागवून घेतली़ दुसरी बस (क्ऱ एम़ एच़१४/बी़टी़२२६२) आल्यानंतर मतदान यंत्रे, कर्मचारी घेवून उस्मानाबादकडे गेली़ त्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सपोनि पवार यांनी चंद्रकांत पाटील यास ताब्यात घेवून शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली़ त्यावेळी पाटील यानी मद्यार्क प्राषण केल्याचा अहवाल आला़ त्या अहवालानंतर पोना सुधीर तुगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटील याच्याविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात प्रोग़ु़ऱनं़ ६४/१४ कलम ८५ (१) महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम ११२/ ११७ महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे़ तसेच प्रभाकर शेळके यांनी जामीन दिल्याने चंद्रकांत पाटील याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे़ त्यामुळे ढोकी येथे मतदान यंत्रणाच्या पेट्या पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, तेथे तळीरामाने गोंधळ घातला असल्याचेही ढवळे यांनी पत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)