खाम नदीला पूर
By Admin | Updated: July 12, 2016 01:07 IST2016-07-12T00:32:45+5:302016-07-12T01:07:14+5:30
वाळूज महानगर : तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे रविवारी आलेल्या पुरामुळे वाळूजच्या खाम नदीवरील पुलाला ठिकठिकाणी भगदाडे पडली.

खाम नदीला पूर
वाळूज महानगर : तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे रविवारी आलेल्या पुरामुळे वाळूजच्या खाम नदीवरील पुलाला ठिकठिकाणी भगदाडे पडली. अर्धा पूल वाहून गेल्यामुळे दळणवळण ठप्प होण्याची भीती शेतकरी व नागरिकांकडून वर्तविली जात आहे.
वाळूज येथील सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाम नदी असून, पावसाळ्यात सतत खाम नदीला पूर येत असल्यामुळे सहा-सात वर्षांपूर्वी या नदीवर पूल बांधण्यात आला होता. मात्र, गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अल्पावधीतच पुलाची दुरवस्था झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी खाम नदीला आलेल्या पुरामुळे या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ग्रामपंचायतीने जि.प.कडे पाठपुरावा केल्यानंतर डागडुजी करण्यात आली होती. यंदा तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी खाम नदीला पूर आला. या पुरामुळे पुलावर ठिकठिकाणी भगदाडे पडली असून, अर्धा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी खाम नदीच्या पलीकडे असल्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. स्मशानभूमीही तिकडेच आहे. या पुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत, ज्ञानेश्वर देसाई, शिवप्रसाद अग्रवाल, सचिन काकडे, रवी मनगटे आदींनी केली आहे.