राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:52 IST2017-12-28T00:51:45+5:302017-12-28T00:52:14+5:30
विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत केरळ संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत केरळ संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
या स्पर्धा १३, १७, १९ वर्षांखालील सहा वजन गटात झाल्या. निकाल (१३ वर्षांखालील ३८० कि.) : १. केरळ, २. तेलंगणा, ३. दिल्ली.
१५ वर्षांखालील (४४० किलो) : १. केरळ, २. दिल्ली, ३. पंजाब. १७ वर्षांखालील (४८० किलो) : १. पंजाब, २. केरळ, ३. दिल्ली. ५०० कि. : १. केरळ, २. दिल्ली, ३. पंजाब. १९ वर्षांखालील (५४० किलो) : १. केरळ, २. पंजाब, ३. दिल्ली. ५६० किलो : १. पंजाब, २. केरळ, ३. दिल्ली. बक्षीस वितरण विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, विद्यापीठाचे सिनेट सदस्य फुलचंद सलामपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी भारतीय रस्सीखेच संघटनेचे तांत्रिक चेअरमन मदन मोहन, सचिव माधवी पाटील, राज्य संघटनेचे सचिव जनार्दन गुपिले, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, प्रा. एकनाथ साळुंके, विलास चंदने, गणेश बेटुदे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, राहुल वाघमारे आदी उपस्थित होते.